मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सुकन्या मोनेंना ओळखलं जातं. ‘बाईपण भारी देवा’ या यंदाच्या वर्षी सर्वाधिक गाजलेल्या मराठी चित्रपटात अभिनेत्री सुकन्या मोने यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्यांनी नुकत्याच या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला आपल्या ९० वर्षीय आईसह हजेरी लावली होती. त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका इन्स्टाग्राम स्टोरीने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सुकन्या मोने प्रत्येक मुलाखतीत त्यांच्या लेकीबद्दल भरभरून बोलत असतात. सुकन्या व संजय मोनेंची लाडकी लेक ज्युलिया शिक्षणानिमित्त परदेशात राहते. तिच्याबरोबर अनेक फोटो वर व्हिडीओ त्या सोशल मीडियावर शेअर करतात.

हेही वाचा : लगीनघाई! मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेचा ग्रहमख सोहळा पडला पार, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

सुकन्या मोनेंनी नुकताच त्यांच्या लाडक्या लेकीसाठी खास टॅटू काढून घेतला आहे. त्यांची लेक ज्युलियाने तिच्या इन्टाग्राम स्टोरीवर या नव्या टॅटूचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने “आईबरोबर काढलेला टॅटू” असं कॅप्शन दिलं आहे. लाडक्या लेकीची स्टोरी रिशेअर करत सुकन्या मोनेंनी या व्हिडीओवर “आयुष्यभर लक्षात राहील अशी आठवण” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ : ‘त्या’ घटनेनंतर सुभेदारांच्या घरात मोठी उलाढाल! भूतकाळामुळे सायली-अर्जुनचं नातं नव्या वळणावर, पाहा प्रोमो…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुकन्या मोनेंनी हातावर काढलेल्या या नव्या टॅटूची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर यावर्षी त्यांनी गाजलेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय यापूर्वी त्यांनी अनेक दर्जेदार मालिका व चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.