‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ३० जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे सगळे शो हाउसफुल होत आहेत. आता या चित्रपटाने १० दिवसांत किती कमाई केली हा आकडा समोर आला आहे. हा आकडा शेअर करत केदार शिंदे यांनी एक खास पोस्ट केली आहे.

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची कथा, चित्रपटाचे संवाद, सर्व कलाकारांचा अभिनय, चित्रपटाची गाणी या सर्वांनाच प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. पहिल्या तीन दिवसात ६.४५ कोटींची कमाई करत हा चित्रपट पहिल्या वीकेंडला सर्वाधिक कमाई करणारा या वर्षीचा मराठी चित्रपट ठरला. त्यानंतर या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी एकूण १३.५० कोटींची कमाई केली. तर प्रदर्शनाच्या दहा दिवसांमध्ये या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.

आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यावर ‘अशी’ होती वंदना गुप्तेंच्या पतीची प्रतिक्रिया, खुलासा करत म्हणाल्या, “आता त्याला…”

या चित्रपटाने दहा दिवसांमध्ये एकूण २६.१९ कोटींचा गल्ला जमवला. ही माहिती केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिली. ‘बाईपण भारी देवा’च्या कलेक्शनचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, “नि: शब्द…काही घटना आयुष्यात घडतात त्या फक्त आनंद व्यक्त करण्यासाठी. हे सगळं अनाकलनीय आहे. त्यावर निर्विवाद वर्चस्व आहे ते…मायबाप प्रेक्षकांचं. त्या परमेश्वराचा आशिर्वाद…हा सिनेमा आता आमचा राहीला नाही. तो प्रेक्षकांचा झाला आहे. अनेक विक्रम प्रेक्षकांच्या नावे या सिनेमाने निर्माण करावेत हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. श्री सिध्दीविनायक.”

हेही वाचा : अंकुश चौधरीच्या पत्नीचा ‘बाईपण भारी देवा’तील लूक आहे खूप खास, हातातल्या ब्रेसलेटमागे दडलाय मोठा अर्थ, घ्या जाणून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता केदार शिंदे यांची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून पोस्टवर कमेंट करत चाहते चित्रपट आवडल्याचं सांगत आहेत. प्रेक्षकांबरोबरच अनेक कलाकारांनी ही या पोस्टवर कमेंट करत त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव केला आहे.