मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री रेशम टिपणीसचं नाव आवर्जून घेतलं जातं. ‘मराठी बिग बॉस’मध्ये सहभागी होत रेशमने प्रेक्षकांची मनं जिंकली. सोशल मीडियावर सतत चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रेशमच्या आईचं निधन झालं आहे. तिने आईसह काही फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे पोस्ट करत दुःख व्यक्त केलं.

रेशम तिच्या आईच्या खूप जवळ होती. आईच्या निधनानंतर ती कोलमडून गेली आहे. आईसह फोटो पोस्ट केल्यानंतर एक खंतही तिने व्यक्त केली. शिवाय आईचा आणि तिच्या होणाऱ्या गप्पा-गोष्टी ती मिस करणार असल्याचंही रेशमने म्हटलं आहे.

रेशम म्हणाली, “आई…यापुढे तुझा फोन मला कधीच येणार नाही या गोष्टीवर माझा अजूनही विश्वास बसत नाही. तू मला खंबीर बनवलंस. मी तूला वचन देते की यापुढेही मी अशीच खंबीर राहिन. खूप प्रेम. मला तुझी खूप खूप आठवण येईल.”

आणखी वाचा – “कंगनाला पद्मश्री मग आम्हाला…” प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीने भारत सरकारवर केली टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेशम तिच्या आईच्या आठवणींमध्ये भावूक झाली आहे. तसेच रेशमने ही भावूक पोस्ट शेअर करताच कलाकारांसह तिच्या चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. रेशमच्या आईला सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांनी व कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच रेशमला स्वतःला सांभाळण्याचा सल्ला तिच्या चाहत्यांनी दिला आहे.