‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. आशयावरून वादात अडकलेल्या या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही केली गेली. पण कोर्टाने त्यास नकार दिला व चित्रपट ५ मे रोजी देशभरात प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. अशातच अनेक ठिकाणी चित्रपट टॅक्स फ्री देखील करण्यात आला. यानंतर ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक ट्वीट केलं होतं.

हेही वाचा – ‘The Kerala Story’च्या कमाईत तिसऱ्या दिवशी मोठी वाढ; जमवला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

हेही वाचा – “या नेत्यांना…” महाराष्ट्रात ‘द केरला स्टोरी’ मोफत दाखवणाऱ्यांबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी काही राजकीय तसेच सामाजिक संघटनांकडून ‘द केरला स्टोरी’चे मोफत शो आयोजित करण्यात येत आहेत, असं केदार शिंदे म्हणाले होते. “दुर्दैव… महाराष्ट्रात “केरला स्टोरी” या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने “महाराष्ट्र शाहीर” प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?” असं ट्वीट त्यांनी केलं होतं. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देत केदार शिंदेंवर टीका केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“केदार शिंदे साहेब, ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट केवळ महाराष्ट्रात चालत नाहीये, देशभरात चालतोय. कारण तो जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तो सिनेमा चालला तर तुमच्या पोटात का दुखतंय? हिंदुंच्या हिताच्या चार गोष्टी समोर येतायत म्हणून? त्यामुळे एवढंच सांगेन, करोनाच्या काळात स्वित्झर्लंडला जाऊन राहावसं वाटतं, ही तुमची देशभक्ती आहे. म्हणून उगाच हिंदुत्वाच्या व हिंदू समाजाच्या आड येण्याचा प्रयत्न करू नका,” असं उत्तर केदार शिंदे यांच्यावर टीका करत अतुल भातखळकर यांनी दिलं.