बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसुझा या जोडीची कायमच चर्चा होत असते. दोघांनी तुझे मेरी कसम या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, जिनिलिया डिसुझाने याआधी तेलगू, तमिळ, कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडची ही लाडकी मराठमोळी जोडी आता मराठीत एका चित्रपटातून समोर येत आहे.
रितेशने नुकतंच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याच्या आगामी ‘वेड’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला होता. आता या चित्रपटाची एक मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचा टीझर आपल्या भेटीस येणार आहे. रितेशने आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
थोडं प्रेम, थोडा विरह आणि संपूर्ण वेडेपणाची गोष्ट. उद्या घेऊन येतोय एक झलक (टिझर) उद्या घेऊन येतोय एक झलक. उद्या दुपारी १२ ला या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे. असं त्याने पोस्टमध्ये सांगितलं आहे.
“मनात आत्महत्येचे विचार…” ‘हड्डी’ चित्रपटातील मराठमोळ्या गंगाने सांगितला धक्कादायक अनुभव
रितेश देशमुखने याआधी ‘लई भारी’, ‘माउली’ या मराठी चित्रपटात काम केले आहे. या दोन्ही चित्रपटात जिनिलिया रितेश केवळ गाण्यात एकत्र दिसले होते. रितेशने या चित्रपटात अभिनयाच्या बरोबरीने दिग्दर्शनदेखील केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तो दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.
-
ritiesh deshmukh
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया मुख्य भूमिकेत दिसणार असून रितेश याचं दिग्दर्शन करणार आहे. याबरोबरच बॉलिवूडचा दबंग सलमान खानही यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. सलमान रितेशच्या ‘लय भारी’मध्येही छोट्याश्या भूमिकेत दिसला होता. रितेश जेनीलियाचा हा ‘वेड’ ३० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.