दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ‘ती सध्या काय करते’ हा अभिनयचा पहिला चित्रपट. यामध्ये अभिनेत्यासह आर्या आंबेकरने प्रमुख भूमिका साकारली होती. आता लवकरच अभिनय ‘बॉईज ४’ चित्रपटाच्या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा : “पूर्वी सोशल मीडियावरून जहरी टीका करणारा बच्चन आज…”, किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले, “स्वाभिमान गुंडाळून…”

‘बॉईज ४’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा काही दिवसांपूर्वी संपन्न झाला. यावेळी मीडियाशी संवाद साधताना अभिनयने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. ट्रेलरमध्ये अभिनयचा बाईकवरून एन्ट्री घेतानाचा सीन लक्ष वेधून घेतो त्यामुळे, “खऱ्या आयुष्यात तू बाईक चालवायला केव्हा शिकलास?” असा प्रश्न त्याला विचारण्याल आला. यावेळी अभिनय म्हणाला, “मला जेवढी बाईक चालवता येते ती फक्त सिनेमापुरती येते. प्रत्यक्षात माझ्या आईने मला कधीच गाडी चालवू दिली नाही.”

हेही वाचा : दीड महिन्यांनी मुंबईत परतलेल्या संकर्षणने घेतला ‘या’ मराठमोळ्या पदार्थाचा आस्वाद, म्हणाला “मध्यरात्री अडीच वाजता…”

अभिनय पुढे म्हणाला, “आपण मुंबईकर असल्याने आईने मला पहिल्यापासून ट्रेनने फिरण्याची सवय केली होती. त्यामुळे बाईक घेऊन फिरणं कधीच झालं नाही. काही सिनेमांमध्ये काम करण्यासाठी मला गाडी चालवणं शिकावं लागलं. आता कुठे मला थोडीफार अ‍ॅक्टिव्हा चालवता येते. म्हणून मी गाड्या फक्त सिनेमापुरत्याच सेटवर चालवतो.”

हेही वाचा : Video : अमिताभ बच्चन यांच्यासह जाहिरातीत झळकणार हेमांगी कवी, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बॉईज ४’ चित्रपट येत्या २० ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. अभिनयची यामध्ये नेमकी काय भूमिका आहे याबद्दल त्याच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.