‘बटरफ्लाय बटरफ्लाय’ या गाण्याचा ट्रेंड अजूनही सोशल मीडियावर सुरू आहे. अनेक कलाकारांनी या गाण्यावर मजेशीर व्हिडीओज बनवले आहेत. मराठी सिनेसृष्टीतील कलाकारही यात मागे नाहीत. नुकताच वैभव मांगले आणि अन्य कलाकारांनी या गाण्यावर डान्स करत याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकाच्या सेटवर वैभव मांगले, भार्गवी चिरमुले, सुकन्या काळण, निमिष कुलकर्णी आणि विकास चव्हाण हे कलाकार या गाण्यावर थिरकताना दिसले. गाण्याच्या मजेशीररित्या डान्स स्टेप्स करत या कलाकारांनी हशा पिकवला. या व्हिडीओद्वारे त्यांनी ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकाचं चांगलंच प्रमोशन केलं आहे.

मराठी कलाकारांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी कलाकारांच्या या नाचगाण्याचा आनंद लूटत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये दिल्या आहेत. “माझ्या पहिलीतल्या मुलाच्या गॅदरिंगमध्ये गेल्यासारखं वाटलं, परफेक्ट सगळे चुकत होते”, अशी एकाने कमेंट केली; तर “मस्त मजा करता तुम्ही” असं दुसऱ्याने लिहिलं.

हेही वाचा… VIDEO: होळीनिमित्त ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी शेअर केला खास व्हिडीओ, चाहते म्हणाले, “वयाचा विसर पडेल…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘मर्डरवाले कुलकर्णी’ नाटकाचे प्रयोग कोथरूड, विलेपार्ले, बोरिवली, पुणे, नाशिक येथे होणार आहेत. या नाटकात वैभव मांगले, भार्गवी चिरमुले, सुकन्या काळण, निमिष कुलकर्णी आणि विकास चव्हाण असे तगडे कलाकार आहेत.