अभिनेता चिन्मय मांडलेकर सध्या ‘सुभेदार’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. शिवराज अष्टक मालिकेतील ‘सुभेदार’ हा पाचवा चित्रपट आहे. अष्टक मालिकेतील सगळ्या चित्रपटांमध्ये चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटात महाराजांची भूमिका साकारताना कशी तयारी केली? आणि कोणत्या नियमांचे पालन केले याबाबत अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

हेही वाचा : “ब्लू टिक विकत घे, नाहीतर…”, ट्विटर युजरच्या सल्ल्यावर हिना खानने दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाली, “माझे आयुष्य…”

सुभेदार चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाचा भव्य कार्यक्रम पुण्यात संपन्न झाला. याठिकाणी मीडियाशी संवाद साधताना अभिनेता चिन्मय मांडलेकर म्हणाला, “छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करताना मी खूप नियम पाळतो. यातील सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे, मी शिवरायांच्या पोशाखात असताना केव्हाच कोणाबरोबरही सेल्फी काढत नाही आणि काढणार सुद्धा नाही. पूर्ण पोशाख, जिरेटोप घातलेला असताना अगदी देशाचे पंतप्रधान जरी आले तरीही मी सेल्फी काढणार नाही. तुम्हाला माझे त्या पोशाखातील सेल्फी फोटो सापडणार सुद्धा नाहीत.”

हेही वाचा : ‘गेम ऑफ थ्रोन्स’ बॉलिवूडमध्ये बनली असती तर ‘हे’ कलाकार दिसले असते महत्त्वाच्या भूमिकेत; AI ने केलेली निवड पहा

चिन्मय मांडलेकर पुढे म्हणाला, “संपूर्ण पोशाख घातल्यावर, तयारी केल्यावर मी छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत असतो. त्यांच्या मान राखलाच गेला पाहिजे. माझ्या या नियमामुळे अनेकांचा हिरमोड होतो परंतु, मी त्यांना सांगतो माझी तळमळ, भावना समजून घ्या… सेल्फी काढणे शक्य नाही, मी नकार देतो.”

हेही वाचा : “बॉडीमुळे नाही, तर….”, अभिषेक बच्चनने नवोदित अभिनेत्यांना दिला सल्ला; म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जेव्हा प्रत्यक्ष लोकेशनवर शूटिंग सुरु असते, तेव्हा अनेक लोक तुम्हाला भेटायला किंवा शूट पाहायला येतात. अशावेळी त्या पोशाखाचा आणि महाराजांचा सन्मान करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे एकदा त्या भूमिकेत गेल्यावर मी सेटवर कोणतीही गोष्ट करताना मर्यादा आणि तारतम्य बाळगतो. कारण, महाराजांचा सन्मान राखणे महत्त्वाचे असते.” असे चिन्मय मांडलेकरने सांगितले. दरम्यान, बहुचर्चित ‘सुभेदार’ चित्रपट येत्या १८ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीया येणार आहे.