Rishi Manohar Wedding : मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रथमेश-मुग्धा, स्वानंद-गौतमी, सोनल-समीर, सुरुची-पियुष या लोकप्रिय जोडप्यानंतर आता आणखी एक अभिनेता विवाहबंधनात अडकणार आहे. तो म्हणजे ‘दादा एक गुड न्यूज आहे’ फेम अभिनेता ऋषी मनोहर. या नाटकामध्ये ऋषीसह उमेश कामत, ऋता दुर्गुळे आणि आरती मोरे यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

भावा-बहिणीच्या नात्याची गोड गोष्ट सांगणारं ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटक काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलं. या नाटकामुळे ऋषी घराघरांत लोकप्रिय झाला आणि आता लवकरच तो लग्न करणार आहे. त्याचा साखरपुडा मे २०२३ मध्ये पार पडला होता. यानंतर डिसेंबरमध्ये व्याहीभोजनाचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने लग्न करणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली. पुण्यातील ढेपे वाड्यात हा सोहळा पार पडला.

हेही वाचा : “तू पाठीशी होतीस म्हणून…”, पत्नीच्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदेंची खास पोस्ट; म्हणाले, “आज ५१ वर्षे…”

ऋषी हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पौर्णिमा गानू मनोहर यांचा लेक आहे. ‘राजवाडे अँड सन्स’, ‘सुराज्य’, ‘तुझं माझं जमेना’, ‘पेट पुराण’, ‘वाडा चिरेबंदी’ अशा अनेक मालिकांमध्ये त्याच्या आईने काम केलं आहे. ऋषीच्या हळद, मेहंदी आणि ग्रहमख सोहळ्यातील बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा : अमृता खानविलकरकडून चाहत्यांना नववर्षाचं सरप्राईज! ‘या’ हिंदी सीरिजमध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका, पाहा पहिली झलक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ऋषीच्या होणाऱ्या बायकोचं नाव तन्मई असं असून ती प्रसिद्ध दंतरोगतज्ज्ञ म्हणून काम पाहते. या दोघांच्या फोटोंवर ‘दादा एक गुड न्यूज आहे’मधील ऋषीची सहकलाकार ऋता दुर्गुळेने हार्ट इमोजी कमेंट करत यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.