अभिनेता प्रसाद ओक हा कायमच चर्चेत असतो. प्रसाद ओकला कायमच त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखले जाते. गेल्यावर्षी त्याचा ‘धर्मवीर’ हा चित्रपट प्रचंड गाजला. त्याच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. नुकतंच या चित्रपटासाठी प्रसाद ओकला फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले आहे. याबद्दल त्याने पोस्ट शेअर केली आहे.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
“अजून एक BLACK LADY घरात…!!! ती पण अशा LADY च्या हातून जिचा मी लहानपणापासून चाहता आहे. THE GORGEOUS अश्विनी भावे.
पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार टीम धर्मवीर, मंगेश देसाई आणि अर्थातच प्रविण तरडे…!!!
धन्यवाद फिल्मफेअर
दुसरा फोटो दोन BLACK LADIES चा…!!!”, अशी पोस्ट प्रसाद ओकने केली आहे.
त्याच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. अभिनेता जितेंद्र जोशी याने या पोस्टवर ‘अभिनंदन’ अशी कमेंट केली आहे. तर ऋतुजा बागवेने ‘हार्ट’ इमोजी शेअर केला आहे. त्याबरोबर अभिनेत्री हेमांगी कवीने कमेंट केली आहे. तिने “बघ मी म्हटलं होतं!!! केलंय न regret! मंजिरी ओक, प्रसाद ओक अभिनंदन”, असे म्हटले आहे.