scorecardresearch

Premium

मराठमोळा ‘सुभेदार’ चित्रपट अजय देवगणच्या ‘तान्हाजी’वर पडला भारी, IMDBवर मिळवले ‘इतके’ रेटिंग्स

‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाला IMDB वर ‘सुभेदार’ने मागे टाकलं आहे.

subhedar tanhaji

गेले अनेक महिने ‘सुभेदार’ या मराठी चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. अखेर २५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. याच विषयावरील एक बिग बजेट हिंदी चित्रपट तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं नाव ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ असं होतं. तर आता या चित्रपटाला IMDB वर ‘सुभेदार’ने मागे टाकलं आहे.

सुभेदार चित्रपटाला सध्या सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचं प्रेक्षक खूप कौतुक करत आहेत. या चित्रपटाची अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ या चित्रपटाशीही तुलना केली जात आहे. पण यामध्ये ‘सुभेदार’ हा चित्रपट वरचढ ठरला आहे. IMDB साईटवर ‘सुभेदार’ला ‘तान्हाजी’ चित्रपटापेक्षा जास्त रेटिंग मिळाले आहेत.

Shivrayancha Chhava Movie Review
Shivrayancha Chhava Movie Review : अतिरंजक शौर्यगाथा
razakar-trailer
“ओम शब्द आणि भगवा रंग…”, हैदराबाद नरसंहारावर बेतलेल्या ‘रजाकार’ चित्रपटाचा अस्वस्थ करणारा ट्रेलर प्रदर्शित
bobby-deol-animal-spin-off
बॉबी देओलच्या चाहत्यांसाठी खुशखबर, अब्रार हकवर येणार स्वतंत्र चित्रपट; ‘अ‍ॅनिमल’च्या मार्केटिंग हेडचा मोठा खुलासा
shahrukh-oscar-winning-film
तब्बल आठ ऑस्कर जिंकणाऱ्या ‘या’ चित्रपटातील भूमिका शाहरुख खानने नाकारलेली; नेमकं कारण जाणून घ्या

आणखी वाचा : “‘सुभेदार’ जूनमध्ये येणार होता ना?” नेटकऱ्याच्या प्रश्नाला दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी दिलेलं उत्तर चर्चेत, म्हणाले…

१० जानेवारी २०२० रोजी ‘तान्हाजी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ओम राऊतने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं तर अजय देवगन आणि काजोल यांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारल्या. या चित्रपटाने जगभरातून बक्कळ कमाई केली. या चित्रपटाला IMDB वर ७.५ रेटिंग आहे. तर दुसरीकडे सुभेदार या चित्रपटाला IMDB वर ९.७ रेटिंग आहे.

हेही वाचा : Subhedar trailer reactions: “साउथवाले ‘केजीएफ’, ‘पुष्पा’ बनवतात आणि मराठी माणूस…”, ‘सुभेदार’चा ट्रेलर पाहून नेटकरी थक्क, म्हणाले…

दरम्यान, ‘सुभेदार’ या चित्रपटामध्ये मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, स्मिता शेवाळे, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Digpal lanjekar directorial marathi film subhedar got more ratings on imdb than ajay devgan starter tanhaji rnv

First published on: 27-08-2023 at 12:37 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×