Dashavatar Gross Box Office Collection : कोकणाच्या मातीतला ‘दशावतार’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर बॉलीवूड चित्रपटांना मात देतोय. ‘दशावतार’ला जगभरात उत्तम प्रतिसाद मिळतोय. ‘दशावतार’च्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ‘दशावतार’ जगभरात सहा दिवसांमध्ये किती गल्ला जमवला, याबाबतची अधिकृत आकडेवारी निर्मात्यांनी जाहीर केली आहे.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘दशावतार’ची प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत ‘दशावतार’च्या कलेक्शनच्या आकडेवारीवरून त्याला मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम दिसून येतंय. झी स्टुडिओने ‘दशावतार’च्या सहा दिवसांच्या कलेक्शनची आकडेवारी जाहीर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
“मराठी प्रेक्षक बनला बाबुलीचा राखणदार!!!
तुमच्या उदंड प्रतिसादामुळे आपल्या मातीतली ही कला आता जगभर गाजत आहे. मराठी रसिक मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार!!!
तुमच्या या साथीनं आपल्या “दशावतार” चित्रपटानं अवघ्या ६ दिवसांत ९.४५ कोटींचा (Gross box office collection) मोठा टप्पा पार केला आणि हा प्रवास पुढेही असाच सुरू राहो, हीच आमची मनापासून इच्छा!” असं कॅप्शन देत निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.
पाहा पोस्ट-
सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज आहे. तसेच विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.