गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडिया वापरण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. आपले मत, विचार व्यक्त करण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी माध्यम मानले जाते. मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत सक्रिय असतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत ते चाहत्यांना त्यांच्या प्रत्येक घडामोडीची माहिती देत असतात. दरम्यान, एका अभिनेत्रीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, त्या फोटोमध्ये अभिनेत्रीचा चेहरा दिसत नसल्याने ती नेमकी कोण, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

अभिनेत्रीने तिच्या एका चित्रपटाच्या सेटवरचा हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती पाठमोरी उभी आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नाव कमावल्यानंतर या अभिनेत्रीने नुकतेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. एका दाक्षिणात्य चित्रपटातील लूकचाच फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा- सिद्धेशचा पहिल्यांदा फोटो पाहताच घाईघाईत निघालेली पूजा सावंत थांबली अन्…; किस्सा सांगत म्हणाली…

या फोटोतील अभिनेत्री दुसरी-तिसरी कुणी नसून, महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी आहे. सोनालीने आपल्या इन्स्टाग्रामवरून हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करीत तिने फक्त ‘रंगरानी’ असे लिहिले आहे. ‘मलाइकोट्टई वालीबान’ या तिच्या मल्याळम चित्रपटाच्या सेटवरचा तो फोटो आहे. सोनालीचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या फोटोवर कमेंट्स व लाइक्सचा पाऊस पाडला आहे.

सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, आतापर्यंत तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता नुकतेच तिने ‘मलाइकोट्टई वालीबान’ चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिच्याबरोबर साऊथचा सुपरस्टार मोहनलाल यांची प्रमुख भूमिका आहे. २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता लवकरच सोनाली ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ यांच्या भूमिकेत झळकणार आहे.