मराठी सिनेसृष्टीत अभिनेते अरुण नलावडे यांनी आपल्या अभिनयाने स्वतःची एक वेगळी छाप उमटवली आहे. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत लिलया वावर असणारे हरहुन्नरी अभिनेते म्हणून अरुण नलावडे यांच्याकडे पाहिलं जात. ते फक्त अभिनयापुरते मर्यादित न राहता त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण अशा या अष्टपैलू कलाकाराला मात्र एकेदिवशी तुम्ही भिकेला लागला असं काहीजण म्हणाले होते. याचा किस्सा ‘द क्राफ्ट’ला दिलेल्या मुलाखतीमधून त्यांनी सांगितला.

हेही वाचा – ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्री नंदिता पाटकरनं चाहत्यांना दिली आनंदाची बातमी; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “एक सिक्रेट…”

अभिनेते अरुण नलावडे यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र त्यांचा ‘श्वास’ हा चित्रपट विशेष गाजला. या चित्रपटात त्यांनी एक अभिनेता म्हणून काम केलंच. पण त्यांनी या चित्रपटांच्या निर्मितीची जबाबदारी देखील पेलली होती. हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट करताना त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. याचाच किस्सा अरुण नलावडे यांनी ‘द क्राफ्ट’च्या मुलाखतीमध्ये सांगितला.

हेही वाचा – अभिनेत्री ईशा केसकर दिसणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत? ‘या’ कारणामुळे चर्चांना उधाण

अरुण नलावडे म्हणाले की, “‘श्वास’ चित्रपटाची कथा ५० लोकांना ऐकवली. ५० पैकी ५० लोकं रडले. पण त्यांनी आम्हाला हा चित्रपट करू नका असा सल्ला दिला. हा चित्रपट कोणी बघणार नाही, या विषयावर चित्रपट नको? खूप रडका चित्रपट आहे. तुम्ही सुद्धा हा चित्रपट करू नका नाहीतर तुम्ही भिकेला लागला. काहींनी तर कथेत बदल करायला सांगितलं. तुम्ही असं करा, तसं करा असे सल्ले दिले. पण चित्रपटासाठी पैसे मात्र कोणीही दिले नाही.”

हेही वाचा – “मी सात महिने घरी बसलेलो, कारण सुबोध भावे…”, चिन्मय मांडलेकरनं सांगितला ‘तो’ किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘श्वास’ या चित्रपटाची कहाणी सत्यघटनेवर आधारित होती. ‘श्वास’ने मराठी चित्रपटसृष्टीचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलं. ऑस्करमध्ये नॉमिनेशन मिळलेला हा मराठीमधला पहिला चित्रपट होता. तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेता असलेला हा दुसरा मराठी चित्रपट होता.