Ekda Yeun Tar Bagha Teaser : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकरने ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. दिग्गज विनोदवीरांची मांदियाळी असलेल्या या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साधणारे विनोदवीर २४ नोव्हेंबरला या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.

हेही वाचा : केदार शिंदेंच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस! ‘तो’ फोटो शेअर करत सनाला दिला मोलाचा सल्ला; म्हणाले, “एकच लक्षात ठेव…”

point of view All India Entrance Exam presentation
ताणाची उलगड: स्वत:चा दृष्टिकोन बदला
Chandrapur, Sudhir Mungantiwar, Pratibha Dhanorkar,
चंद्रपूर : राजकीय आखाड्यात, चौका-चौकात, कट्ट्यावर रंगू लागल्या ‘ताई’ आणि ‘भाऊ’च्या चर्चा; सट्टाबाजारात…
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाचा दमदार टीझर नुकताच प्रेक्षकाच्या भेटीला आला. १ मिनिटं ४ सेकंदाच्या टीझरमध्ये प्रेक्षकांना कलाकारांच्या भूमिका आणि कथानकाविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. गिरीश कुलकर्णी आणि त्यांचे कुटुंबीय एका नव्याकोऱ्या हॉटेलची सुरूवात करतात. पात्रांची नावं टीझरमध्ये उघड करण्यात आलेली नाहीत.

हेही वाचा : १९८९ च्या ‘हमाल दे धमाल’मधील कॅमिओसाठी अनिल कपूर यांनी किती मानधन घेतलं? जयंत वाडकरांनी केला खुलासा

‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटात अभिनेत्री तेजस्विनी पंडित गिरीश कुलकर्णींच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारेल. याशिवाय ओंकार भोजने व प्रसाद खांडेकर त्यांचे भाऊ आणि नम्रता संभेराव चित्रपटात तेजस्विनीची बहीण असल्याचं टीझरमधून स्पष्ट होतं. हे कुटुंबीय मिळून नवंकोरं हॉटेल सुरू करतात. परंतु, नव्या हॉटेलमध्ये अतरंगी पाहुण्याची एन्ट्री झाल्यावर गोष्टी कशा बदलतात याचा आनंद प्रेक्षकांना २४ नोव्हेंबर रोजी घेता येईल.

हेही वाचा : ठरलं तर मग : “मधूभाऊंची सुटका होईल का?”, जोगतीण सायलीला देणार ‘हा’ आशीर्वाद, मालिकेचा नवा प्रोमो आला समोर…

दरम्यान, या चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनाची जबाबदारी प्रसाद खांडेकरने सांभाळली आहे. याशिवाय चित्रपटात तब्बल १६ विनोदवीर भूमिका साकारणार आहेत. यामध्ये सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, भाऊ कदम, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, राजेंद्र शिसटकर, वनिता खरात, रोहित माने, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, जय चौबे, राकेश शालिन यांचा समावेश आहे. हा बहुचर्चित चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.