अभिनेता शरद केळकर त्याच्या भारदस्त आवाजामुळे तसेच दमदार भूमिकांमुळे चर्चेत असतो. सध्या तो ‘हर हर महादेव’ चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटामध्ये त्याने साकारलेली बाजीप्रभू देशपांडे ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत २ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाला मिळणार प्रतिसाद तसेच चित्रपटामधील भूमिकेला मिळणारा प्रतिसाद पाहून शरद भारावून गेला आहे. याच चित्रपटाच्यानिमित्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान शरदने त्याच्याबाबत होणाऱ्या चर्चांवर भाष्य केलं.

आणखी वाचा – आता अशी दिसते मराठी मालिकांमध्ये काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री, अभिनयक्षेत्रामधून ब्रेक घेत अमेरिकेमध्ये स्थायिक झाली अन्…

‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद अजय देवगणच्या आगामी चित्रपटामध्ये काम करण्याबाबत बोलला आहे. तो म्हणाला, “अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटामध्ये मी काम करणार असल्याचं सतत बोललं जात आहे. पण मी हे सांगू इच्छितो की या चित्रपटाशी माझा काहीच संबंध नाही. पण अजयबरोबर आणखी एका प्रोजेक्टबाबत बोलणं सुरु आहे. याबाबत पुढील वर्षीपर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल.”

इतकंच नव्हे तर शरदने तो कशाप्रकारे आयुष्य जगतो याबाबतही सांगितलं. “मी अगदी सामान्य व्यक्ती आहे. मी माझं काम करतो आणि काम संपलं की सरळ घरी जातो. मी असं काहीच करत नाही की लोक माझ्याबाबत चुकीची चर्चा करतील. मी सरळ-साधं आयुष्य जगतो.” असं शरद म्हणाला.

आणखी वाचा – “मला रात्री झोप येत नाही तेव्हा…” नवऱ्याविषयी बोलताना कतरिना कैफने उघड केलं बेडरुम सिक्रेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी चुकीच्या गोष्टी कधीच करत नाही. मी जस जसा कलाक्षेत्रामध्ये पुढे येईन तसं माझ्याबाबतही वाद निर्माण होऊ शकतात. पण मी असंच साधं आयुष्य जगू इच्छितो. मी कोणाशी भांडतही नाही आणि वादग्रस्त विधानही करत नाही. मी या सगळ्या गोष्टींपासून लांबच राहतो.” शरद इतकं साधं आयुष्य जगतो हे खरंच कौतुकास्पद आहे.