scorecardresearch

‘ही अनोखी गाठ’ : श्रेयस तळपदेचं दमदार कमबॅक! शरद पोंक्षेसह ‘काहे दिया परदेस’ फेम अभिनेत्याने वेधलं लक्ष, ट्रेलर प्रदर्शित

‘ही अनोखी गाठ’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित! श्रेयस तळपदे – गौरी इंगवलेबरोबर ‘हा’ अभिनेता साकारणार महत्त्वाची भूमिका

hee anokhi gaath trailer launch
‘ही अनोखी गाठ' चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

श्रेयस तळपदे आजारपणानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. महेश मांजरेकरांच्या ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ‘व्हॅलेंटाईन वीक’च्या निमित्ताने नुकताच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केलं आहे.

‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’, ‘पांघरूण’ या चित्रपटानंतर महेश मांजरेकर पुन्हा एकदा एक आगळी वेगळी प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. वडिलांच्या इच्छेखातर मनाविरुद्ध झालेलं लग्न, पूर्वाश्रमीच्या प्रियकराची आठवण यामुळे एकंदर कुटुंबावर कसा परिणाम होतो. याची अप्रतिम मांडणी या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. शेवटी श्रेयस-गौरीची ‘ही अनोखी गाठ’ जुळणार का? याचा उलगडा १ मार्चला चित्रपटगृहात होणार आहे.

Raj thackeray target to sankarshan karhade over calling nickname
भर कार्यक्रमात राज ठाकरेंनी संकर्षण कऱ्हाडेचे कान टोचले, म्हणाले, “त्या दिवशी मी नाट्य संमेलनामध्ये…”
Suhas Joshi revel the reason for the rejection of Kaksparsh film
“…म्हणून मी काकस्पर्श चित्रपट करायला दिलेला नकार”, १२ वर्षांनंतर सुहास जोशींनी सांगितले कारण; म्हणाल्या, “अडीच वर्ष…”
How did pallavi subhash recover after a breakup
प्रसिद्ध अभिनेत्याबरोबरचं ८ वर्षांचं नातं मोडल्यानंतर पल्लवी सुभाष कशी पडली यातून बाहेर, म्हणाली, “एखाद्याबरोबर असलेलं…”
Sharad Ponkshe on caste survey
“माझ्या घरीसुद्धा नगरपालिकावाले आले होते”, जात सर्वेक्षणाबद्दल शरद पोंक्षेंचे विधान; म्हणाले, “मी ब्राह्मण आहे, मला…”

हेही वाचा : सई ताम्हणकरचा आवडता राजकीय पक्ष कोणता? बाळासाहेब ठाकरे, नितीन गडकरींचा उल्लेख करत म्हणाली…

चित्रपटाबद्दल महेश मांजरेकर सांगतात, “नात्याची एक अनोखी गोष्ट प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रेयसबरोबर प्रथमच काम करतोय. त्याचा अभिनय मी पाहिला आहे. तो अतिशय हुशार अभिनेता आहे. याशिवाय ही अनोखी गाठ’च्या निमित्ताने गौरीला पुन्हा एकदा तिचे नृत्यकौशल्य सादर करण्याची संधी मिळाली आहे. या व्यतिरिक्त या चित्रपटात अनेक नावाजलेले कलाकार आहेत. खूप साधी, सरळ तरीही अनोखी अशी ही प्रेमकहाणी आहे. एक सुंदर कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करत आहोत, खात्री आहे प्रेक्षक त्याला इतर चित्रपटांप्रमाणेच आपलंसं करतील.”

हेही वाचा : रितेश देशमुखच्या वहिनीचा सख्खा भाऊ आहे जॅकी भगनानी, बहीण व भाच्यांबरोबर शेअर केलेत खास फोटो

दरम्यान, या चित्रपटामध्ये दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. श्रेयस तळपदेसह गौरी इंगवले, ‘काहे दिया परदेस’ फेम अभिनेता ऋषी सक्सेना ( प्रियकर), शरद पोंक्षे ( गौरीचे वडील), सुहास जोशी आदींनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hee anokhi gaath trailer launch shreyas talpade comeback after heart attack sva 00

First published on: 12-02-2024 at 20:27 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×