‘कुंकू झालं वैरी’, ‘आयला रे’, ‘तुझं माझं जमेना’, ‘नो प्रॉब्लेम’, ‘हॅप्पी जर्नी’ यांसारख्या चित्रपटात झळकलेली, हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पल्लवी सुभाष फारशी आता कुठे दिसत नाही. २०२२ साली ती ‘सेकंड शो’ या दाक्षिणात्य चित्रपटात शेवटची दिसली होती. सध्या पल्लवी जाहिरात क्षेत्रात काम करत आहे. पण लवकरच तिचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

पल्लवी जितकी तिच्या कामामुळे चर्चेत असायची तितकीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत होती. एकेकाळी पल्लवीचं मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याबरोबरच अफेअर चांगलंच गाजलं होतं. ८ वर्ष दोघं एकमेकांना डेट करत होते. पण पल्लवीचं हे ८ वर्षांचं असलेलं नात क्षणात मोडलं. त्यानंतर यातून ती कशी सावरली? याविषयी अभिनेत्रीने नुकतंच सांगितलं.

हेही वाचा – २४ वर्षांच्या ‘या’ प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरने खरेदी केला अक्षय कुमारचा फ्लॅट, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत म्हणाली…

‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तसंस्थेशी बोलताना पल्लवी सुभाषने ८ वर्षांच्या नातं मोडल्यानंतर कशी यातून बाहेर पडली याबद्दल सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, “बराच काळ एखाद्याबरोबर असलेलं नातं संपल्यानंतर त्यातून बाहेर पडायला वेळ लागतो. त्रासही होता. हे सगळं मी अनुभवलं आहे. मात्र याचं वेळी मी ‘अशोका’ मालिकेसाठी काम करायला सुरुवात केली. यामुळे मी त्यात व्यग्र झाले. मालिकेकडे लक्ष दिल्यामुळे मन त्यात गुंतलं होतं. माझ्या आयुष्यात घडलेल्या या गोष्टींची कल्पना मालिकेच्या टीमलाही होती. त्यामुळे त्या सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं.”

हेही वाचा – Video: मधुरा वेलणकरची बहीण झळकणार ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत, साकारणार महत्त्वाची भूमिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पल्लवीने नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे. मराठीसह हिंदी, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. भविष्यात चरित्रपटात काम करण्याची इच्छा पल्लवीने व्यक्त केली आहे.