Marathi Film Jhimma 2 : अभिनेत्री निर्मिती सावंत लवकरच बहुचर्चित ‘झिम्मा २’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर गेल्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटातील संवाद, कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे ‘झिम्मा २’च्या ट्रेलरला प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात निर्मिती सावंत ‘निर्मला’ हे पात्र साकारत आहेत.

‘झिम्मा २’च्या ट्रेलरमध्ये निर्मला दारु पित असल्याचा सीन प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो. यामध्ये सगळ्या बायका एकत्र पार्टी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या सीनसाठी प्रत्यक्षात निर्मिती सावंत यांनी कशी तयारी केली होती याविषयी अभिनेत्रीने ‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना खुलासा केला आहे.

निर्मिती सावंत म्हणाल्या, “मला कसलंच व्यसन नाही. दारु, सिगारेट, तंबाखू, चहा, गुटखा कसलंच नाही. पण, तरी ते सीन माझ्याकडून एवढे छान कसे होतात हे मला कळालेलं नाही. याबद्दल मला बऱ्याच जणांनी विचारलं आहे. कदाचित प्रत्येकाचं निरीक्षण करून मी शिकले असेन.”

हेही वाचा : “गौतम गंभीरला पुन्हा केकेआरमध्ये का घेतलं?”, चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख खान म्हणाला…

“चित्रपटात मी निर्मला नावाचं पात्र साकारतेय. ही निर्मला गावाकडची मोकळी ढाकळी बाई आहे. अशात ती दारू प्यायली आणि तिला चढली, तर ती निर्मला कशी वागेल याचा मी कधीच विचार केला नव्हता. या सगळ्या गोष्टी सेटवर आपसूकच होऊन गेल्या. एखादा सीन किंवा भूमिका करताना मी फक्त स्वत:ला बजावते की, आता तू निर्मला कोंढेपाटील आहेस… निर्मिती सावंत नाही. त्यानुसार मी माझी भूमिका साकारते.” असं निर्मिती सावंत यांनी सांगितलं.

हेही वाचा : सायली अर्जुनला देणार चक्क डिनर डेटचं सरप्राईज! ‘ठरलं तर मग’ मध्ये येणार ‘असा’ ट्विस्ट, नवीन प्रोमो आला समोर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बहुचर्चित ‘झिम्मा २’ चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये निर्मिती सावंतसह सुचित्रा बांदेकर, शिवानी सुर्वे, सायली संजीव, रिंकू राजगुरू, सुहास जोशी, क्षिती जोग आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.