‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरताना दिसत आहेत. या चित्रपटाला महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत १२ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. त्याबरोबर अनेक रेकॉर्डही ब्रेक केले आहेत. चित्रपटाच्या कथेबरोबर त्यातील संवादही चांगलेच गाजत आहेत. नुकतचं चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी चित्रपटातील संवादाबाबतचा एक किस्सा शेअर केला आहे.

हेही वाचा- “एक पुरुष म्हणून मला…”; केदार शिंदेंनी सांगितला ‘बाई पण भारी देवा’ चित्रपट बनवल्यानंतरचा अनुभव

केदार शिंदे म्हणाले, “चित्रपटात स्पोर्टस ब्रा आणि महिलांनी दारू पिण्याबाबतचा एक संवाद आहे. चित्रपटाची कथा लिहून झाल्यावर मी ती रिव्ह्यूसाठी काही लोकांकडे दिली होती. त्यांनी मला सांगितलं की कथा एकदम छान आहे. फक्त त्यातील ते दोन संवाद काढ. हा सल्ला मला आपल्याच क्षेत्रातील एका मातब्बर व्यक्तीने दिला होता.”

हेही वाचा- ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यावर ‘अशी’ होती वंदना गुप्तेंच्या पतीची प्रतिक्रिया, खुलासा करत म्हणाल्या, “आता त्याला…”

शिंदे पुढे म्हणाले, “मला असं वाटलं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि ते वैशालीने लिहिलं आहे म्हणून मला अजिबात काढायचं नव्हतं. कारण स्त्री खूप सेन्सिटिव्ह असते. ती जर अनकनर्फेटेबल असली असती तर तिने हा डायलॉग लिहिलाच नसता. मला वाचताना असं कधीच वाटलं नाही. त्यामुळे मी यातला एकही शब्द काढणार नाही हे असचं राहणार हे निश्चित केलं होतं.”

हेही वाचा- “आदेशने विवाहबाह्य संबंध ठेवले तर मी…”, सुचित्रा बांदेकरांचं उत्तर चर्चेत

केदार शिंदे यांनी नुकतीच चित्रपटात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या कलाकारांविषयी खास पोस्ट शेअर केली आहे. पडद्यामागच्या कलाकारांची ओळख करून त्यांच्याविषयी लिहित आहेत. नुकतीच त्यांनी ‘महाराष्ट्र शाहीर’ आणि ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटांची वेशभूषाकार युगेशा ओमकार हिच्याविषयी खास पोस्ट लिहित एक खंतही व्यक्त केली आहे.