मराठी अभिनेते व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते किरण माने सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते फेसबूकवर पोस्ट करून साामजिक व राजकीय विषयांवर आपली मतं मांडत असतात. बऱ्याचदा ते नेतेमंडळींची नावं घेत थेट टोलेबाजीही करतात. आता त्यांनी शिवसेनेतून बंडखोरी करून सत्तेत असलेल्या शिवसेना नेत्यांना टोला लगावला आहे.

महाराष्ट्रात यंदा विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकांची जोरदार तयारी राज्यातील सर्वच पक्ष करत आहेत. अशातच किरण मानेंनी केलेल्या पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे. “बाळासाहेबांच्या विचारांच्या, धनुष्यबाण चिन्ह दिमाखात मिरवणार्‍या शिवसेनेला २०१४ मध्ये २० तर २०१९ मध्ये २३ जागा मिळाल्या होत्या… यावेळी ‘हिंदूत्वा’साठी सुरतमार्गे गुवाहाटी गाठणारी, नार्वेकरांनी ‘खरी’ ठरवलेली शिवसेना बाळासाहेबांचं नाव राखण्यासाठी ‘पंचवीस’ जागा तरी मिळवणारच! ये मेरी गॅरंटी है,” अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे. याबरोबरच त्यांनी एक हसणारा इमोजी पोस्ट केला आहे.

“काय अजब रसायन आहे राव हे…” शरद पवारांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत किरण मानेंची पोस्ट; “मी साहेबांचा माणूस…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘दोन आकडी जागा मिळाल्या त्यांना तर मी तुम्हाला पेढे पाठवणार’, ‘खरे शिवसैनिक हे जागेवरच आहेत लबाड शिवसैनिक गेले कामाख्या देवीच्या सेवेसाठी, तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही माने सर’, ‘तुमचा अंदाज चुकतोय सर्वच्या सर्व ४८ जागा त्यांनाच देतील, तेच जिंकतील म्हणून तर त्यांना सोबत घेतलं ना,’ अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी किरण मानेंच्या पोस्टवर केल्या आहेत.