किरण माने यांनी दिवंगत बॉलीवूड अभिनेता इरफान खानसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. इरफान यांचा अभिनय, त्यांचे बोलके डोळे आणि त्यांनी बॉलीवूड ते हॉलीवूमध्ये केलेल्या भुमिका यांचा उल्लेख किरण मानेंनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे.

“भावा, तुझे डोळे…
एखाद्या गहिर्‍या डोहासारखे होते रं !
आजबी रूतून बसलेत काळजात.
आयुष्यभर रहातील तिथंच वस्तीला… तू लहान असताना तुझे वडील तुला पाहुन म्हनायचे “ये ऑंखे नहीं. ‘जाम’ है भरे हुए” उफ्फ्फ !
एक ‘अभिनय’ सोडला तर मला दुनियादारी म्हाईत नाय. त्यामुळं बाकीच्या फकांड्या मारत नाय. अभिनेता म्हनून एकच कळतं… एखादं उत्तम लिहीलेलं ‘कॅरॅक्टर’ नखशिखान्त मुरवून घेनं… भिनवून घेनं… ‘आतल्या’ – मनामेंदूतल्या महासागरात चालनार्‍या भरती-ओहोटींसकट देहबोलपर्यन्त साकारनं… हे लै लै लै मोठ्ठं – अवाढव्य काम असतं. खायचं काम नाय हे.
पन तू? हे एवढा मोठ्ठ्ठा अभिनयाचा भव्य हिमनग निव्वळ नुसत्या डोळ्यांवर पेलून धरायचास राव ! नादखुळा.. भिरकीट… नुस्त्या नजरंतनं जाळ न् धूर संगटच काढायचास !
बॉलीवूड-हॉलीवूड सकट सगळी दुनिया पागल केलीस बहाद्दूरा… सगळ्या जगावर गारूड केलं तुझ्या त्या दोन जादूभर्‍या – दर्दभर्‍या डोळ्यांनी ! ‘मकबुल’ असो नायतर ‘मदारी’… ‘पान सिंग तोमर’ असो नायतर ‘पिकू’… लंचबॉक्स, नेमसेक, लाईफ ऑफ पाय, लाईफ इन मेट्रो, हासिल… तुला मिळालेल्या भुमिकेची अख्ख्खी जिंदगी ‘निचोड’कर तू त्या डोळ्यांत भरायचास आनी आमच्यासमोर आनून ओतायचास…
तू अभिनयाबाबतीत सगळ्या जुन्यापान्या जळमटांवरनं झाडू फिरवलास. सगळ्या चौकटींवरनं बुलडोझर फिरवुन चक्काचूर केलास. सगळ्या चाकोर्‍यांवरनं जेसीबी फिरवलास.
गांवखेड्यातनं आलेल्या – ‘स्मॉलटाऊन’ – साधारन चेहर्‍याच्या पन अभिनयाची अफाट – अचाट ‘पॅशन’ असलेल्या पुढच्या पिढ्यांसाठी तू आता एव्हरेस्टसारखा उभा आहेस… तुझे ते जादूई दोन डोळे या जगात नाहीत पण कुठूनतरी अशा अभिनेत्यांवर नजर ठेवून आहेत… एखाद्या सावलीसारखे…
इरफान, काल ‘मकबुल’ परत एकदा बघितला… परत एकदा काळजात कालवाकालव झाली… परत एकदा मेंदूतून झिणझिण्या आल्या… तस्साच नखशिखान्त हादरलो… आणि परत एकदा डोळे पाणावले… तुझी लै लै लै आठवण आली. मिस यू. लब्यू भावा – किरण माने,” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
policeman committed suicide by shooting himself in the head
नागपूर : डोक्यात गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाचा ताण की…

दरम्यान, आपल्या अभिनयाने आणि बोलक्या डोळ्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारे इरफान खान यांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. पण त्यांचे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. त्यांचा ‘मकबुल’ चित्रपट पुन्हा पाहिल्यानंतर किरण मानेंनी ही पोस्ट लिहीली.