ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं दुर्दैवी निधन झालं. शुक्रवारी तळेगाव दाभाडेजवळ आंबी या गावातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये ते मृतावस्थेत सापडले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच मुलगा गश्मीर महाजनी पुण्याला पोहोचला आहे. तो आई, पत्नी व मुलांसह मुंबईत राहतो, तर वडील रवींद्र इथे एकटेच राहायचे.

रवींद्र महाजनींचा मुलगा गश्मीर तळेगाव दाभाडेला पोहोचला, रुग्णालयातील फोटो आले समोर

गश्मीर व रवींद्र यांनी ‘कॅरी ऑन मराठा’, ‘पानिपत’ आणि ‘देऊळ बंद’ या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं. गश्मीरला एक बहीण आहे, पण ती कधीच समोर आलेली नाही. गश्मीरचे सोशल मीडियावरील फोटो पाहिल्यात त्यात तो अनेकदा आईबरोबर दिसतो, पण वडिलांबरोबरचे फोटो शेअर करताना तो दिसत नाही. गश्मीरने ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता, तेव्हाही त्याची आई तिथे आली होती.

“आठ महिन्यांपासून एकटेच राहत होते रवींद्र महाजनी”, पोलिसांची माहिती; म्हणाले, “मुलगा गश्मीरलाही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेते म्हणून काम करत असतानाच अभिनयाव्यतिरिक्त आपला इतर काहीतरी व्यवसाय असावा, या उद्देशाने रवींद्र महाजनी यांनी बांधकाम क्षेत्रात पार्टनरशिप केली. परंतु, या क्षेत्रात त्यांची मोठी फसवणूक झाली. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. त्यांच्या घरावरही जप्ती आणली गेली. त्यावेळी गश्मीरने वयाच्या पंधराव्या वर्षी त्याची स्वतःची डान्स अकॅडमी सुरू केली आणि वडिलांवरचं कर्ज फेडलं होतं.