मराठी सिनेसृष्टीतून सध्या नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेगळे कथानक असलेले, अनेकविध विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता लवकरच संत मुक्ताबाईंच्या आयुष्यावर आधारित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'(Sant Dnyaneshwaranchi Muktai) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.

संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई कधी होणार प्रदर्शित?

सोशल मीडियावर नुकतेच संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. हा चित्रपट १८ एप्रिल २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पोस्टरमध्ये संत ‘मुक्ताई’ विठ्ठलाची आराधना करताना दिसते आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरने केले आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्पाल लांजेकर यांनी म्हटले की, देहरूपाने संपले तरी कार्यरूपाने संजीवन असणाऱ्या मुक्ताबाईंच्या कार्य व विचारांना जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी मुक्ताईने निभावलेल्या माता, भगिनी, गुरु अशा विविध भूमिकांचे पदर ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून उलगडणार आहेत. स्त्री-पुरुष भेदापलीकडे जगणे शिकविणाऱ्या संत मुक्ताईंचा खडतर आणि भक्तिरसाने परिपूर्ण जीवनप्रवास आजच्या पिढीला माहीत व्हावा यासाठी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटात दिसणार आहे.

चित्रपटातील संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. कला दिग्दर्शन प्रतीक रेडीज, तर ड्रोन आणि स्थिर छायाचित्रण प्रथमेश अवसरे यांनी केले आहे. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के, तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्य दिग्दर्शन किरण बोरकर, तर ध्वनी आरेखन निखिल लांजेकर यांचे आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत. केतकी गद्रे अभ्यंकर कार्यकारी निर्मात्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.