‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामधून अभिनेता कुशल बद्रिके प्रेक्षकांना खळखळून हसवतो. मोठ्या पडद्यावरही त्याने साकारलेल्या विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडल्या. कुशलला आजवर प्रेक्षकांनी विनोदी भूमिकांमध्ये काम करताना पाहिलं आहे. आता तो एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये दाखल होईल. विशेष म्हणजे या चित्रपटात कुशल नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वीच कुशलचा या चित्रपटामधील लूक समोर आला होता. क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ ही व्यक्तीरेखा तो साकारताना दिसणार आहे. त्याचा नकारात्मक भूमिकेतील लूक पाहून प्रेक्षकांनीही कुशलचं कौतुक केलं. आता त्याने या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो अभिनेता संतोष जुवेकरबरोबर मजा मस्ती करताना दिसत आहे.

आणखी वाचा – “जिजा प्रेमात पडेल तेव्हा…” आदिनाथ कोठारेचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

कुशल व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “‘रावरंभा’ चित्रपट चित्रित करत असताना हा माईक बूम बघून संतोष सारखा म्हणे यार मला हा ससा वाटतोय. त्यानंतर पुढचं चित्रीकरण करणं काही माझ्याच्याने होईना. मग डिओपी संजय जाधव सर व दिग्दर्शक अनुप जगदाळे सर यांना थांबवून आम्ही आधी हे चित्रीत केलं.

आणखी वाचा – Video: “ही पूर्ण वेळ नशेतच…”, बॉडीगार्डला धडकणाऱ्या निसा देवगणला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, “ही काजोलची…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जे आम्हाला नीट चित्रीत करता आलंच नाही. सगळा वेळ हसण्यात गेला आणि त्यानंतर चित्रपटाचा गंभीर सीन चित्रित केला. १२ मेला आमचा “रावरंभा” चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने ही आठवण शेअर करत आहे. तसं ‘रावरंभा’ हा वेगळा चित्रपट आहे. पण मी आणि संतोष ही जोडीही वेगळीच आहे”. कुशलच्या या नव्या चित्रपटाबाबत प्रेक्षकांनाही उत्सुकता लागून राहिली आहे.