अभिनेत्री व नृत्यांगना माधुरी पवार हे नाव आपल्या सर्वांनाच परिचयाचं आहे. साताऱ्यात अगदी गरीब कुटुंबात जन्मलेल्या माधुरीने आपल्या अभिनय व नृत्याच्या जोरावर मराठी चित्रटपसृष्टीत काम मिळवलं. सीरिज व मालिकांमध्ये काम करून माधुरीला खूप लोकप्रियता मिळाली. पण, तिचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, त्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला होता.

“शाळेत राडे झाले होते”, माधुरी पवारने सांगितला पहिल्या लव्ह लेटरचा किस्सा; म्हणाली, “मुलाचं नाव…”

सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेल्या माधुरीने ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आयुष्याबद्दल, संघर्षाबद्दल भाष्य केलं. लहानपण झोपडपट्टीत पत्र्याच्या घरात गेलं, त्याच घरात राहून शिक्षण पूर्ण केलं, असं माधुरीने सांगितलं. दरम्यान, माधुरीला कधी पालकांचा मार खावा लागलाय का? असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर माधुरीने एक घटना सांगितली आहे.

“कॉलेजला जाताना एका मुलाने शिट्टी मारली अन्…”, मराठी अभिनेत्रीने सांगितला किस्सा; म्हणाली, “मी बॅगमधून…”

“एकदा आई-बाबांचं भांडण सुरू होतं. आता वडील दारू पित नाही, पण त्यावेळी प्यायचे, त्यामुळे त्यांचं मानसिक संतूलन ठिक नव्हतं. दारूच्या नशेत त्यांनी आईला मारण्यासाठी हात उचलला आणि मी मध्ये आले, त्यामुळे मला लागलं. तेव्हा पहिल्यांदा दुर्दैवाने मी मार खाल्ला होता. त्यानंतर बाबांना खूप वाईट वाटलं होतं. त्यांनी स्वतःच्या हाताला इजा करून घेतली होती. त्यानंतर त्यांनी कधीच मारलं नाही. त्या एका घटनेशिवाय मला लहानपणापासून कधीच मार पडला नाही,” असं माधुरीने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, माधुरी सध्या साताऱ्यातच राहते. तिला तिथेच राहायला खूप आवडतं. ती शुटिंगसाठी साताऱ्याहून मुंबईचा प्रवास करत असते. तिने आतापर्यंत ‘रानबाजार’ या वेब सीरिजसह ‘देव माणूस’ व ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये भूमिका केल्या होत्या.