Maharashtracha Favourite Kon 2023 : रितेश आणि जिनिलीया देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘वेड’ चित्रपट डिसेंबर २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत सगळे रेकॉर्ड्स मोडले होते. जिनिलीयाने ‘वेड’च्या निमित्ताने मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. याशिवाय रितेशचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट होता. बॉलीवूडच्या बड्या कलाकारांच्या सिनेमाला ‘वेड’ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर दिली होती. नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्याला याची पुन्हा एकदा प्रचिती आली.

‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ या मराठी कलाविश्वातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटाचा जलवा पाहायला मिळाला. ‘वेड’ चित्रपटाने एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ महत्त्वाच्या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. याची खास पोस्ट रितेशने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

हेही वाचा : “या वयात सुद्धा कमाल आवाज…”, प्रशांत दामलेंच्या गाण्याच्या व्हिडीओवर चाहतीची कमेंट, अभिनेते म्हणाले, “आताच…”

रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ (मुंबई फिल्म कंपनी), ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ (रितेश देशमुख), ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ (रितेश), ‘सर्वोत्कृष्ट गाणं’ ( सुखं कळले ), ‘सर्वोत्कृष्ट गायक’, ‘सर्वोत्कृष्ट गायिका’, ‘सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चेहरा’ (जिनिलीया), ‘स्टाईल आयकॉन ऑफ द इयर'( रितेश ) अशा नऊ महत्त्वाच्या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं.

हेही वाचा : सासूबाईंचं कौतुक! मृणाल कुलकर्णींना पुरस्कार मिळताच शिवानी रांगोळेची खास पोस्ट, ठरल्या महाराष्ट्राच्या फेवरेट…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेत्याने पोस्ट शेअर करत ‘वेड’ चित्रपटाशी संबंधित सर्वांचे याशिवाय अजय-अतुल, श्रेया घोषाल, झी टॉकीज व ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांचे आभार मानले आहेत. सध्या मराठीसह बॉलीवूड कलाविश्वातून रितेश-जिनिलीयावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.