सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. एकमेकांना बरीच वर्षे डेट केल्यावर या दोघांनी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं प्रेम कायम जाहीरपणे व्यक्त करत असतात. त्यांच्या रोमँटिक फोटोंवर चाहते नेहमीच कौतुकाचा वर्षाव करतात. अशातच सिद्धार्थ-मितालीचं सुंदर बॉण्डिंग दर्शवणारा एक गोड व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर या दोघांनी जोडीने अलीकडेच ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्रीने काळ्या रंगाचा वन शोल्डर गाऊन, तर सिद्धार्थने बायकोच्या लूकला मॅचिंग असा सूट परिधान केला होता.

हेही वाचा : प्रथमेश परबच्या साखरपुड्यात अंगठीची होतेय चर्चा! अनोख्या डिझाइनने वेधलं लक्ष, पाहा फोटो

सिद्धार्थ-मितालीला यावेळी “तुम्हा दोघांचा आवडता दागिना कोणता? दोघांनी वेगळी उत्तर द्या” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर क्षणाचाही विलंब न करता अभिनेत्याने “माझी बायको…” असं उत्तर दिलं. नवऱ्याचं भन्नाट उत्तर ऐकून मिताली देखील भारावून गेल्याचं पाहायला मिळालं. या पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण १८ फेब्रुवारीला संध्याकाळी ७ वाजता ‘झी टॉकीज’वर करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Video : ‘तू अशी जवळी रहा’ म्हणत तितीक्षा तावडेला सिद्धार्थने ‘अशी’ घातली लग्नाची मागणी, सेटवर दिलं खास सरप्राईज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सिद्धार्थ चांदेकरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर गेल्या दोन-तीन महिन्यांत तो ‘झिम्मा २’, ‘ओले आले’, ‘श्रीदेवी प्रसन्न’ अशा एकापेक्षा एक दमदार चित्रपटांमध्ये झळकला आहे. आता भविष्यात सिद्धार्थला आणखी वैविध्यपूर्ण भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.