सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल मराठीतील दिग्गज अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मत मांडलं आहे. मी बनवलेला चित्रपट आवडला नसेल तर त्याबद्दल बोला, पण माझ्या बायको, आई किंवा मुलीबद्दल बोलायचा हक्क तुम्हाला कोणी दिला? असा प्रश्न महेश मांजरेकरांनी विचारला. यावेळी त्यांनी ट्रोलिंग रोखण्यासाठी कायदा करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. “मला या गोष्टीचा भयंकर राग येतो. राग यायलाही हवा. लोक म्हणतात ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करा. पण दुर्लक्ष का करायचं? कोणी हक्क दिला तुम्हाला? मी काही तुमच्याबद्दल वैयक्तिक बोललो आहे का? मी एक चित्रपट बनवतो, तो तुम्ही पाहिला, तुम्ही तो पाहण्यासाठी पैसे मोजले, त्यामुळे त्याबद्दल बोलायचा तुम्हाला हक्क आहे. मला सिनेमा आवडला नाही आणि माझे पैसे फुकट गेले किंवा मला आवडला आणि माझे पैसे वसूल झाले. तुम्ही मला क्रिएटिव्हली क्रिटीसाईज केलं तर माझं काहीच म्हणणं नाही. कारण तुम्ही माझे प्रेक्षक आहात आणि मी तुमच्या आवडीचा आदर करतो. पण मी एखादी पोस्ट केली की माझी आई, वडील, माझी मुलगी, बायकोला बोलायचा हक्क कोणाला देत नाही. मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन,” असं महेश मांजरेकर म्हणाले.

श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”

पुढे महेश मांजरेकर म्हणाले, “तुम्ही माझ्या कामावर बोला, पण दरवेळी माझ्या आईला का बोलता? मी तुम्हाला वैयक्तिक काही म्हणालो आहे का? एकदा तर माझ्या मुलीबद्दल मी इतकं वाईट काहीतरी लिहिलं होतं मी शोधलं त्याला आणि तक्रार केली होती. अशा लोकांना का माफ करावं? हे सर्व तेव्हाच संपेल जेव्हा सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट करण्यासाठी एक कायदा तयार केला जाईल.”

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी एकदा महेश मांजरेकरांनी गुढीपाडव्याला फॅमिली फोटो शेअर केला होता, त्यावर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला त्यांनी सुनावलं होतं. तसेच त्याच्याविरोधात तक्रारही दिली होती.