सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी मराठीसह बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. महेश यांच्यासह त्यांची पत्नी मेधा मांजरेकरही उत्तम अभिनेत्री आहेत. आता त्यांच्या पाठोपाठ महेश यांची मुलं सई, सत्या व गौरी मांजरेकरही कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करू इच्छित आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच महेश यांचा मुलगा सत्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला असल्याची घोषणा केली.

सत्या महेश यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटामधून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार होता. मात्र तो या चित्रपटामध्ये आता कोणतीच भूमिका साकारणार नसल्याचं बोललं जात आहे. पण या सगळ्या चर्चांमध्ये सत्याने त्याची नवी सुरुवात केली आहे. ‘सुका सुखी’ (Suka Sukhi) असं सत्याच्या हॉटेलचं नाव आहे.

आणखी वाचा – “लोकांना असं वाटतं की, आमच्याकडे खूप पैसे आहेत पण…” वनिता खरातचा खुलासा, म्हणाली, “माझे आई-वडील अजूनही…”

आणखी वाचा – स्वतःपेक्षा १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती रश्मिका मंदाना, साखरपुडाही झाला पण…

सत्याने त्याच्या हॉटेलचे काही फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याने हॉटेलच्या बाहेर बसण्यासाठी सुंदर जागा बनवली असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच दिवसाचा खास मेन्यू काय हे हॉटेलच्या बाहेर एका बोर्डवर नियमितपणे लिहिण्यात येतं. विशेष म्हणजे मालवणी पद्धतीचे सुके मासे ही या हॉटेलची खासियत आहे.

आणखी वाचा – दोन मुलं, अफेअर, १३ वर्षांचा संसार मोडला अन्…; जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचा उल्लेख करत शबाना म्हणाल्या, “प्रेम होतं म्हणून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अस्सल मालवणी पदार्थांचा आस्वाद सगळ्यांना घेता यावा म्हणून सत्याने हे अनोखं हॉटेल सुरू केलं आहे. सत्याने जेव्हा या हॉटेलच्या नावाची घोषणा केली तेव्हा सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. पण व्यवसाय सांभाळत सत्या अभिनयक्षेत्रामध्येही आपलं नशीब आजमावणार का? हे पाहावं लागेल.