मराठी अभिनेत्री मानसी नाईकने २०२१ मध्ये बॉक्सर व मॉडेल प्रदीप खरेरा याच्याशी लग्न केलं होतं. पण लग्नाला दोन वर्षे होण्यापूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मानसी सिंगल आहे, तर पूर्वाश्रमीच्या पतीने वर्षभरापूर्वी साखरपुडा केला.
प्रदीप खरेराने सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर विशाखा जाटनी हिच्याशी जुलै २०२४ मध्ये साखरपुडा केला. अद्याप त्यांचं लग्न झालेलं नाही. प्रदीप व विशाखा एकमेकांबरोबर रील बनवतात. सण साजरे करतात. ते त्यांचे फोटो व व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. अशातच प्रदीपने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मानसी नाईकचा उल्लेख करत कमेंट्स केल्या आहेत.
प्रदीप खरेराने त्याचं व विशाखाचं लग्न ठरलं, तेव्हाचा व्हिडीओ नुकताच पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांच्या साखरपुड्याची झलकही पाहायला मिळतेय. “आधी नातं जुळलं, मग साखरपुडा झाला आणि आता लवकरच लग्न,” असं कॅप्शन त्याने व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
पाहा व्हिडीओ
‘हा मानसी नाईकचा एक्स पती आहे,’ ‘एवढी सुंदर मानसी नाईक, हा तिचा होऊ शकला नाही तर हिचा काय होणार’, ‘विशाखा विचार कर त्याने इतकी सुंदर मराठी अभिनेत्री मानसी नाईकला सोडलं, तर तू कोण आहेस’, ‘लग्न झाल्यावर वर्षभरानंतरची पोस्ट पाहू आम्ही, मानसी नाईकबरोबरही लव्ह मॅरेज केलं होतं, आता तुझा नंबर आहे,’ ‘लग्नानंतर घटस्फोट’, ‘हिच्यापेक्षा मानसी नाईक चांगली होती’, ‘माहित नाही का पण मला हा माणूस अजिबात आवडत नाही तो मानसीबरोबर प्रामाणिक राहिला नाही,’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी प्रदीप खरेराच्या या व्हिडीओवर केल्या आहेत.

मानसी नाईक व प्रदीप खरेराचा घटस्फोट
मानसी नाईक व प्रदीप खरेरा यांनी जानेवारी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली होती. दोघेही आनंदाने संसार करत होते, एकमेकांबरोबर फिरायला जायचे, फोटो व व्हिडीओही शेअर करत असायचे. पण अचानक संसारात वादळ आलं आणि अवघ्या दीड वर्षातच त्यांनी घटस्फोट घेतला. “आमच्यात नेमकं काय चुकलं हे सांगणं आता माझ्यासाठी कठीण आहे. आमच्यात काही गोष्टी ठीक होऊ शकल्या नाहीत. पण हे सगळं खूपच वेगाने घडलं. आजही माझा प्रेमावर विश्वास आहे,” असं मानसी नाईक घटस्फोटाबद्दल बोलताना म्हणाली होती.