अभिनेत्री मानसी नाईकचं खासगी आयुष्य सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने पती प्रदीप खरेरापासून विभक्त होणार असल्याचं सांगितलं. या दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पण मानसी व प्रदीपमधील सोशल मीडिया वॉर संपायचं नाव घेत नाही. मानसीने आता पुन्हा एकदा सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – “दोन दोन पोरी भेटल्या, पार्ट्या करतो” मानसी नाईकच्या वक्तव्यानंतर प्रदीपनेही सुनावलं, म्हणाला, “माझ्याबद्दल कोण…”

प्रदीपने अश्लील इशारे करत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला होता. तर दुसरीकडे प्रदीपवरुन मानसीला सुनावणाऱ्या एका युजरला तिने अगदी सडेतोड उत्तर दिलं होतं. आता तिच्या खासगी आयुष्याबाबत सतत होणाऱ्या चर्चांनंतर तिने सकारात्मक पोस्ट शेअर केली आहे.

मानसी म्हणाली, “या जगात हार मानणं खूप सोप आहे. पण मी माझ्या पालकांना वचन दिलं आहे की मी कधीच हार मानणार नाही. तसेच कोणत्याही गोष्टी सोडणार नाही. माझ्या इच्छाशक्तीला कमी लेखू नका. वाईट वेळ ही प्रत्येकाची येते. आज ती वेळ माझी आहे.”

आणखी वाचा – ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेता होणार बाबा, बायकोने फ्लॉन्ट केला बेबी बंप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझं हृदय माझ्या आईशी जोडलं गेलेलं आहे. तिने नऊ महिने त्यासाठी मेहनत घेतली आहे. मी वाढत आहे तसेच चमकत आहे. मी कोणतीही समस्या नाही. आई-बाबांची लाडकी राजकन्या.” मानसीने याबरोबरच तिचे काही बोल्ड फोटोही शेअर केले आहेत.