scorecardresearch

“कुत्र्याचं पिल्लू समजून घरात डुक्कर आणलं, वडिलांना कळालं अन्…”, मराठी अभिनेत्याने सांगितला लहानपणीचा किस्सा

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने कुत्र्याचं पिल्लू समजून घरी आणलं डुक्कर, पुढे काय घडलं वाचा

“कुत्र्याचं पिल्लू समजून घरात डुक्कर आणलं, वडिलांना कळालं अन्…”, मराठी अभिनेत्याने सांगितला लहानपणीचा किस्सा
आशय कुलकर्णीने सांगितला बालपणीचा किस्सा. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आशय कुलकर्णी रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आशय ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. आशय ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी हजेरी लावत आहे.

आशयने नुकतंच लोकमतला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने बालपणीचा एक मजेशीर किस्सा सांगितला. आशयला लहानपणापासूनच प्राण्यांची आवड आहे. त्यामुळेच एकदा त्याने कुटुंबियांच्या नकळत डुकराचं पिल्लू घरात आणलं होतं. बालपणीचा हा किस्सा शेअर करताना आशय म्हणाला, “मी लहानपणी कुत्र्याचं पिल्लू समजून डुकराच्या पिल्लाला घरी घेऊन आलो होतो. बिस्किट वगैरे खायला घालून त्याला मी बाल्कनीत ठेवलं होतं. रात्री माझे बाबा बाहेरगावाहून घरी आल्यानंतर त्यांना कुई कुई असं आवाज येत होता”.

हेही वाचा>> राखी सावंतचा गर्भपात झाल्याच्या चर्चांवर आदिल खानने सोडलं मौन, म्हणाला…

“घरात उंदीर आहे, असं माझ्या बाबांना वाटलं. त्यांनी घरात शोधाशोध सुरू केली. तेवढ्यात त्यांनी बाल्कनीचा दरवाजा उघडला. डुकराचं पिल्लू बावचळलं असल्यामुळे बाल्कनीचा दरवाजा उघडताच त्याने घरात इकडेतिकडे पळायला सुरुवात केली. देव्हाऱ्यातील देवही त्याने उलट-सुलट केले होते. मी झोपलो होतो, त्यामुळे याबाबत मला काहीच कल्पना नव्हती. रात्री बाबांनी खोलीत येऊन मला झोपेतून उठवत मारायलाच सुरुवात केली. त्यानंतर आईने मला कित्येकदा कुत्र्याचं पिल्लू आणायचं का असं विचारलं. पण बाबांच्या भीतीपोटी मी नाही म्हणायचो”, असं म्हणत आशयने त्याच्या बालपणीचा मजेशीर किस्सा सांगितला.

हेही पाहा>>रितेश देशमुख-जिनिलीयाचा ‘वेड’ चित्रपट पाहा फक्त ९९ रुपयांत, कधी आणि कुठे? जाणून घ्या

हेही वाचा>> ‘वेड’बाबत रितेश देशमुखची मोठी घोषणा; चित्रपटामध्ये होणार मोठे बदल, म्हणाला “२० जानेवारीपासून…”

आशय कुलकर्णीने ‘पाहिले न मी तुला’, ‘किती सांगायचंय’ या मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. आता आशय ‘व्हिक्टोरिया’मधून अभिनयाची छाप पाडत आहे. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व पुष्कर जोग मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १३ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 18:46 IST

संबंधित बातम्या