मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये अभिनेते जयवंत वाडकर यांचं नाव टॉपला आहे. त्यांनी आजवर मराठीमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. रुपेरी पडद्यावर जयवंत वाडकर यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिल्या. फक्त मराठीमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्यांनी आपला ठसा उमठवला. आता त्यांनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
जयवंत सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. कामाबाबत तसेच आपल्या खासगी आयुष्याबाबतही ते सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसतात. आताही त्यांनी एक आनंदाची गोष्ट चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. जयवंत यांनी नवी कोरी महागडी गाडी खरेदी केली आहे.
जयवंत यांनी नव्या कारचा व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोंमध्ये त्यांच्यासह त्यांची मुलगीही दिसत आहे. महिंद्रा कंपनीची गाडी त्यांनी खरेदी केली आहे. त्यांनी या नवीन गाडीचे फोटो व व्हिडीओ शेअर करताना म्हटलं की, “माझी नवीन कार. ती आज घरी आली आहे”.
आणखी वाचा – अशी दिसते देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांची लेक, खास पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “दिविजा तुला…”
जयवंत यांच्या चेहऱ्यावरचा आनंदही अगदी द्विगुणीत झाला आहे. त्यांनी ही पोस्ट शेअर करताच नेटकरी त्यांचं अभिनंदन करत आहेत. तर अनेक कलाकार मंडळींनीही ही पोस्ट पाहिल्यानंतर जयवंत यांचं अभिनंदन केलं आहे. जयवंत यांच्यासह त्यांची लेक स्वामिनीही कलाक्षेत्रामध्ये कार्यरत आहे.