मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते किरण मानेंना ओळखले जाते. ते ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामुळे सातत्याने प्रसिद्धीझोतात आहेत. तल्लख बुद्धीच्या जोरावर किरण मानेंनी टॉप ३ मध्ये स्थान मिळवले. बिग बॉसच्या घरातून आल्यानंतर किरण माने हे विविध प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. नुकतंच किरण माने यांनी ‘तेंडल्या’ या चित्रपटासाठी पोस्ट केली आहे.

‘अश्वमेध मोशन पिक्चर्स’ निर्मित ‘तेंडल्या’ हा मराठी चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतंच किरण माने यांनी याबदद्ल एक पोस्ट केली आहे.
आणखी वाचा : “कितीही संकटं येऊ दे, जग इकडचं तिकडं होऊ दे, पण मला…” किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“… बड्या सिनेमाच्या झंझावातात ‘तेंडल्या’ दमदारपण पीचवर उभा आहे! चुकवू नये असं, अस्सल आणि मनोरंजक बऱ्याच वर्षांनी मराठीत आलं आहे. सातारकर भावाबहिणींनो, आपल्याकडं रात्री ८ चा शो आहे. मी आज तिसऱ्यांदा बघणार आहे. तुम्हीही माझ्यासोबत या आणि बघा.”, अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.

किरण माने यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत या चित्रपटाचे शो नसल्याची तक्रार केली आहे. तर काहींनी हा चित्रपट पाहिला असल्याचे सांगत त्याचे कौतुक केले आहे.

आणखी वाचा : गौरव मोरेला यंदाचा राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर, म्हणाला “संभाजी ब्रिगेडचा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तेंडल्या’ या चित्रपटाची कथा ही खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांचं सचिन तेंडुलकरवर असणारं प्रेम आणि क्रिकेट यावर अवलंबून आहे. या चित्रपटाला पाच राज्य आणि एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाची निर्मिती करोना काळापूर्वी झाली होती. यात ओंकार गायकवाड, स्वप्नील पाडळकर, राज कोळी, हर्षद केसरे, महेश जाधव, आकाश तिकोटी हे कलाकार झळकताना दिसत आहेत.