गेल्यावर्षी सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मराठी चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांच्या जीवन प्रवासावर हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचा प्रवास मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. आता अभिनेता क्षितीश दातेने या चित्रपटातील त्याच्या लूकची झलक दाखवली आहे.

क्षितीश दातेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. पण त्याच्या कपाळावरचा कुंकवाचा टिळा, मेकअप आणि दाढी-मिशी पाहायला मिळत आहे. या फोटोला कॅप्शन देताना क्षितीशने “मुक्काम पोस्ट ठाणे” असे म्हटले आहे.
आणखी वाचा : मराठी अभिनेत्याचं बॉलीवूडमध्ये पदार्पण! कार्तिक आर्यनसह शेअर करणार स्क्रीन, फोटो पाहिलेत का?

क्षितीश दातेने ‘धर्मवीर…मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली होती. आता ‘धर्मवीर २’ चित्रपटातही क्षितीश एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

आणखी वाचा : “तुमचा हात…”, भरत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव मोरेची खास पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘धर्मवीर २’ या चित्रपट हिंदुत्वावर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रविण तरडे करणार आहेत. तर मंगेश देसाई हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. आता या चित्रपटात कोण कोणते कलाकार झळकणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहेत. मात्र ‘धर्मवीर २’च्या घोषणेमुळे चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.