प्रसाद ओक, हे सध्याच्या घडीच मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचं नाव आहे. त्याने अभिनायच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तसेच अभिनयाबरोबरच तो आता उत्कृष्ट दिग्दर्शकही झाला आहे. असा हा आघाडीचा अभिनेता सध्या काही चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यादरम्यान काही चाहत्यांनी एका कृतीने प्रसादला आश्चर्याचा धक्का दिला. याचा अनुभव त्याने सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी मालिकेच्या सेटवर २ ते ४ काय करते? पाहा…

अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकने दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये विठुराय दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये प्रसाद हा विठुरायची मूर्ती हातात घेऊन पाहायला मिळत आहेत. यावेळी प्रसादच्या डोक्यावर फेटा आणि गळ्यात हार दिसत आहे. हे फोटो शेअर करत त्यानं चाहत्यांबरोबर तो अनुभव सांगितला. म्हणाला की, “आज अचानक पॅकअप नंतर कपडेपट करणारा आमचा संतोष जगताप व्हॅनिटी वॅनमध्ये आला आणि म्हणाला, “दादा… माझे काही मित्र पंढरपुरातून इथे सांगलीत स्पेशल गाडी करुन फक्त तुला भेटायला आलेत… त्यांना ५ मिनिटं देशील का?” मी म्हटलं बोलाव… त्यानंतर नवनाथ गायकवाड आणि त्यांचे २/३ मित्र अशी काही मंडळी आली… काही कळायच्या आत एकाने मला फेटा बांधला… दुसऱ्याने गळ्यात हार घातला… आणि तिसऱ्याने म्हणजे नवनाथ नी ही सुंदर मूर्ती माझ्या हातात ठेवली… आणि सगळे जाऊ लागले… मी म्हणालो “एवढ्याचसाठी आला होतात?” त्यावर ते म्हणाले “हो दादा… वाटलं ही मूर्ती तुमच्या हातात द्यावी.. बास..” आणि सगळे क्षणार्धात… मला आभार मानण्याची संधीही न देता निघून गेले…”

हेही वाचा – “मी त्याच्यावर खूप प्रेम करते” अभिनेत्री केतकी माटेगावकरचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

पुढे प्रसाद म्हणाला की, “मला खरंच कळत नाही कधी कधी की या अशा निर्लेप, निखळ, निरपेक्ष प्रेमाचं उतराई कसं व्हायचं? या जिव्हाळ्याचं, या आपुलकीचं काय करायचं? सध्या चालू असलेलं काम म्हणजे खरोखरच एक “अवघड वाट” आहे… पुढच्या कामांचंही मनात दडपण आहे… अशा वेळी कुठं चुकलो तर? म्हणून मला “संगत” द्यायला आला असावा की काय तो? या अशाच भांबावलेल्या आणि भारावलेल्या अवस्थेत मी त्या मूर्तीकडे पाहिलं आणि त्या क्षणी “धर्मवीर” मध्यले आमच्या संगीता ताई बर्व्यांनी लिहिलेले शब्द आठवले…
संगतीनं ओलांडला अवघड घाट…चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट…तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट… सुख दुःख एका मेका वाटलं वाटलं…. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल…!!!”

हेही वाचा – केतकी माटेगावकरचं पहिलं लग्न कोणाबरोबर झालंय? जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सध्या प्रसाद ओक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणावर आधारित असलेल्या ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटाच चित्रीकरण करत आहे. तसेच तो स्वप्नील जोशीबरोबर ‘जिलबी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शिवाय त्याचा ‘वडापाव’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.