‘टाईमपास’ चित्रपटामुळे लोकप्रियता मिळविणारा अभिनेता प्रथमेश परब मागच्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. प्रथमेशने मागच्या वर्षी व्हॅलेंटाईन डेला प्रेमाची कबुली दिली होती. तो क्षितिजा घोसाळकरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. आज एक फोटो पोस्ट करत प्रथमेशने लवकरच लग्न करणार असल्याची माहिती दिली आहे.

प्रथमेशने क्षितिजा घोसाळकरबरोबर केळवणाचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्याने दोघांच्या नावापासून तयार केलेला #pratija असा सुंदर हॅशटॅग पोस्टमध्ये दिला आहे.
“#pratija चं ठरलंय हा!
बाकी तारीख लवकरच कळवतो.
(PS- तारीख खूपच Special आहे! हिंट कॅप्शनमध्येच आहे. कमेंटमध्ये गेस करा.)
तोवर…..
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Happppppy “2024” असं प्रथमेशने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

या पोस्टबरोबर त्याने #यंदा कर्तव्य आहे, #केळवण स्टोरीज, #लग्न #साखरपुडा #तयारी_सुरू #pratija #prathameshparab #kshitijaghosalkar असे हॅशटॅगही दिले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kshitija Ghosalkar Parab (@miles_in_style)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रथमेश परबच्या या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. त्याने दिलेल्या आनंदाच्या बातमीनंतर चाहते त्याचं अभिनंदन करत आहेत. प्रथमेशने अद्याप लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही, पण केळवणाची पोस्ट पाहता तो लवकरच लग्नबंधनात अडकेल, असं दिसतंय.