मराठी मालिका, चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून संतोष जुवेकरला ओळखले जाते. त्याने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ यासारख्या अनेक मराठी चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. तो सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. संतोष जुवेकर आणि अंकुश चौधरी एकमेकांचे चांगले मित्र आहेत. नुकतंच त्याने अंकुशसाठी पोस्ट लिहिली आहे.

संतोष जुवेकर हा सोशल मीडियावर सतत सक्रीय असतो. नुकतंच संतोषने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. संतोषने नुकतंच अंकुश चौधरीबरोबर एक फोटो पोस्ट केला आहे. त्याबरोबर त्याने अंकुश चौधरीला काय नावाने हाक मारतो हे देखील सांगितले आहे.
आणखी वाचा : Video : “साडीच्या रंगाचा परकर मिळाला नाही का?” रील व्हिडीओमुळे मानसी नाईक ट्रोल

संतोष जुवेकरची पोस्ट

“आम्ही दोघे आज खूप गॅपनंतर भेटलो आणि आज पाऊस पण पडला आणि आम्ही आज पावसात भिजलो खूप आणि खूप आठवणी आणि खूप गप्पा. तुमची साथ आणि सोबत असूदेरे महाराजा.
माझ्या काहीश्याच तूरळक आवडत्या माणसांन मधला माझा आवडता मित्र माझा दाद्या आमचा Anky Boy अंकुश चौधरी, मेरे बडे मियाँ
Happy पावसाळा तुम्हां सगळ्यांना आणि Good morning सगळ्यांना”, अशी पोस्ट त्याने केली आहे.

आणखी वाचा : “शिवराय अजून कुणालाच कळले नाहीत”, संतोष जुवेकरचे वक्तव्य चर्चेत, म्हणाला “आपल्यापैकी कोणीही इतिहास…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान संतोष जुवेकर आणि अंकुश चौधरी एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. ते दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. विशेष म्हणजे संतोष हा अंकुशला मोठा भाऊ मानतो. त्यांच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी ‘फार मस्त’, ‘छान’, ‘आमच्यासाठी काही खास आहे का?’ असा प्रश्नही चाहत्यांनी विचारला आहे.