‘झेंडा’, ‘मोरया’ या चित्रपटांतून प्रेक्षकांना भुरळ घालणारा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. त्याने अल्पावधीतच मनोरंजनविश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं. संतोष सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आगामी प्रोजेक्ट्सबद्दल पोस्टद्वारे तो चाहत्यांना माहिती देत असतो.

संतोष सध्या लोणावळ्यात त्याच्या मित्रांबरोबर सुट्टीचा आनंद घेत आहे. नुकतंच त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो चुलीवर मटण शिजवताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत संतोषवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा>> “‘आदिपुरुष’च्या टीमला जाळलं पाहिजे”, मुकेश खन्ना यांचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले, “महादेवाने रावणाला…”

“आज चुलीवर मटण बनवायला कम्माल मजा आली उत्तम वातावरण आणि उत्तम company. टन टन वाजलं मटान शिजलं…सखे रस्सा रस्सा वाढ गं!!! चुलीवरचं मटण भावा…नाद खुळा, टांगा पलटी घोडं फरार, खटक्यावं बोट अन् जाग्याव पलटी. मळवली, पाटण गाव, लोणावळा” असं कॅप्शन संतोषने या व्हिडीओला दिलं आहे. संतोषचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

हेही वाचा>> “रामायण हे मनोरंजनासाठी नाही”, सीता मातेची भूमिका साकारलेल्या दीपिका चिखलीया यांचं वक्तव्य, म्हणाल्या, “आदिपुरुष…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संतोष महेश मांजरेकरांच्या ‘बाल शिवाजी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधीही अनेक ऐतिहासिक चित्रपटांत तो दिसला होता. त्याने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रावरंभा’ चित्रपटात जालिंदर ही भूमिका साकारली होती. याशिवाय ‘पावनखिंड’ चित्रपटातही तो दिसला होता.