दिवाळीचा सण दरवर्षी प्रकाशमय आणि उत्साहाचं वातावरण घेऊन येतो. प्रत्येकाच्या जीवनात आनंद, नवचैतन्य घेऊन येणारा हा सण आहे. हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी मानला जातो. आजपासून संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. यंदा अमावस्या दोन दिवस असल्यामुळे पाच दिवसांचा दिवाळी सण सहा दिवसांचा होतं आहे. दिवाळीनिमित्ताने सध्या सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. कलाकार मंडळीदेखील चाहत्यांना शुभेच्छा देत आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने आपल्या अनोख्या अंदाजात दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थने सुंदर कंदीलाचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “सगळं होणार! अगदी आपल्या मनासारखं. उद्या होईल किंवा परवा होईल. पण होणार मात्र नक्की. फक्त आपण जे करतोय त्यावर मनापासून विश्वास ठेवूया. नकोच तो अंधार आपल्या मनात. आजूबाजूच्या गोंगाटात आपल्याला सगळ्यात जास्त शांत करणारे चेहरे, जागा, क्षण डोळ्यासमोर ठेवूया. सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा.”

हेही वाचा – ‘मिर्झापूर : द फिल्म’मध्ये बबलू पंडितची एन्ट्री होणार, IAS अधिकारी म्हणून परतणार?

Siddharath Chandekar Instagram Story
Siddharath Chandekar Instagram Story

त्यानंतर सिद्धार्थने शुभेच्छांमध्ये चुकून लिहिलेल्या शब्दाबद्दलची पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये त्याने स्वतःचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “मला माहित आहे. ते परवा असतं पर्वा नसतं. मुद्दा लक्षात घ्या.”

Siddharath Chandekar Instagram Story
Siddharath Chandekar Instagram Story

हेही वाचा – Video: ‘मुंज्या’, ‘स्त्री २’नंतर आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदानाच्या ‘थामा’ चित्रपटाची घोषणा, पाहायला मिळणार थरारक प्रेम कहाणी

दरम्यान, सिद्धार्थ चांदेकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व ३’चं सूत्रसंचालन करत आहे. तसंच त्याच्या ‘फसक्लास दाभाडे’ नावाच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि नवं पोस्टर नुकतंच जाहीर झालं आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपट २४ जानेवारी २०२५ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरसह क्षिती जोग, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरीश दुधाडे, राजसी भावे, राजन भिसे असे तगडे कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत.