मराठी सिनेसृष्टीतील टॉपचा अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवकडे पाहिलं जातं. फक्त मराठीतच नव्हे तर सिद्धार्थने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. मराठी सिनेसृष्टीतील रणवीर सिंग म्हणूनही त्याला ओळखले जाते. तो कायमच त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत असतो. पण आता सिद्धार्थला एकाने आईवरुन शिवी दिली आहे. त्यामुळे तो संतापल्याचे पाहायला मिळत आहे.

सिद्धार्थ जाधवला अनेकदा विविध कारणांनी ट्रोल केले जाते. त्याला त्याच्या दिसण्यावरुन, कामावरुन अनेकदा लोक ट्रोल करत असतात. कधीकधी या ट्रोलिंगकडे तो दुर्लक्ष करतो. दिसण्यावरून होणाऱ्या ट्रोलिंगला तो गांभीर्याने घेत नाही. पण आता मात्र त्याने एका पोस्टवरील कमेंटवरुन संताप व्यक्त केला आहे.
आणखी वाचा : “मी आणि सिद्धार्थ जाधव १० वर्षे एकमेकांशी बोलत नव्हतो आणि श्रीदेवींच्या निधनानंतर…” सोनाली कुलकर्णीने सांगितला किस्सा

सिद्धार्थ जाधव हा सध्या त्याच्या लेकींबरोबर लंडन टूर करताना दिसत आहे. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात त्याने एका कमेंटचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. त्या कमेंटमध्ये एका नेटकऱ्याने सिद्धार्थला शिवी दिली आहे.

“अरे बावळट बोर्डच्या सिद्ध कितीवर एक्टिंग करशील मा**** काल्या”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. त्यावर सिद्धार्थने सडेतोड उत्तर दिलं आहे. “ट्रोलिंग मान्य आहे, पण शिवी देणं कितपत योग्य आहे? फक्त विचारतोय”, अशी सिद्धार्थने म्हटले आहे.

आणखी वाचा : Ruturaj Gaikwad Marriage : ऋतुराज गायकवाडच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आले समोर, जाणून घ्या तिच्याबद्दल…

siddharth jadhav comment
सिद्धार्थ जाधव

आणखी वाचा : “गेल्यावर्षी जेव्हा मला तुरुंगात टाकण्यात आले, तेव्हा फक्त सावरकरांना…” केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सिद्धार्थ जाधवने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. ‘तमाशा लाईव्ह’, ‘दे धक्का २’, बालभारती, सर्कस हे चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले. सध्या तो वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यात जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके, हार्दिक जोशी, सत्या मांजरेकर, अक्षय कुमार, नवाब खान आणि प्रवीण तरडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.