वैभव तत्ववादी हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘व्हॉट्स अप लग्न’, ‘भेटली तू पुन्हा’ अशी अनेक चित्रपटांत काम करुन वैभवने अभिनयाचा ठसा उमटवला. तो कायमच त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. नुकतंच त्याने बाईपण भारी देवा या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
वैभव तत्त्ववादी हा नुकताच कमांडो वेबसीरिज झळकला. नुकतंच त्याने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे प्रेक्षक पुन्हा मराठी चित्रपटांकडे वळतील असं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. यावर त्याने स्पष्टपणे उत्तर दिले.
आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ नाकारणाऱ्या निर्मात्याने केदार शिंदेना केला मेसेज, म्हणाला “माझी बस चुकली, पण…”
“बाईपण भारी देवा या चित्रपटाला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद हा अप्रतिम होता. मराठी सिनेसृष्टीसाठी हा चित्रपट सकारात्मकता घेऊन आला. जेव्हा प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळतो, तेव्हा तो संपूर्ण मनोरंजनसृष्टीसाठी सकारात्मक बदल असतो. मी आशा करतो की, असा प्रतिसाद यापुढील प्रत्येक मराठी चित्रपटाला मिळावा”, असे वैभव तत्त्ववादीने म्हटले.
दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट सहा बहिणींची कथा आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाने चित्रपटगृहात चांगली कामगिरी केली होती. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, सर्व कलाकारांचा अभिनय याबरोबरच या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.