मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांना ओळखले जाते. सध्या ते दोघेही ‘सुभेदार’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकतंच विराजसने शिवानीबरोबरचा एक जुना फोटो शेअर केला आहे. सध्या तो फोटो व्हायरल होत आहे.
विराजस कुलकर्णी हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. नुकतंच विराजसने इन्स्टाग्रामद्वारे चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी त्याला एका चाहत्याने तुझा आणि शिवानीचा जुना फोटो शेअर कर, अशी विनंती केली.
आणखी वाचा : “…दिग्पाल काका चुकला”, ‘पावनखिंड’ पाहिल्यानंतर चिन्मय मांडलेकराच्या लेकाने दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणालेला “बाजीप्रभू…”
त्यावर विराजसने उत्तर देत त्या दोघांचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. यात विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे, क्षितीज दाते हे दिसत आहे. यावेळी विराजसने स्वत:च्या फोटोला गोल करत तो कुठे असल्याचेही सांगितले आहे.

आणखी वाचा : “मी ‘पावनखिंड’साठी दाढी, मिशी वाढवली होती, पण दिग्पाल दादाने…” विराजस कुलकर्णीचा गौप्यस्फोट
दरम्यान विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांनी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ३ मे २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. सध्या ते दोघेही ‘सुभेदार’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. येत्या १८ ऑगस्टला ‘सुभेदार’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अजय पूरकर सुभेदार तान्हाजी मालुसरेंची व्यक्तिरेखा साकारत आहेत.
