बॉलिवूडप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारदेखील आता विवाहाच्या बंधनात अडकत आहेत. अभिनेत्री अक्षया देवधर, हार्दिक जोशी हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघे लंडनला फिरायलादेखील गेले होते. आता मराठीतील आणखीन एका अभिनेत्रीचा साखरपुडा पार पडला आहे. भाग्यश्री मोटे हिने विजय पालांडे बरोबर साखरपुडा केला आहे. गेली काही वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये भाग्यश्रीने काम केले आहे. ती इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते. ती आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिने आपल्या साखरपुडयाबद्दल माहिती दिली.

Photos : बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांना शाहरुख खानच्या कंपनीने दिले आहेत ‘व्हीएफक्स इफेक्ट्स’

भाग्यश्रीचा होणारा नवरा विजय पालांडे मेकअप डिझायनर आहे. तिने विजय बरोबरचे आपले नाते कधीच लपवले नव्हते. विजय पालांडेबरोबरचे फोटो ती कायम शेअर करत असते. विजयचा नुकताच वाढदिवस होऊन गेला त्यानिमित्ताने तिने एक भाग्यश्रीने दोघांचा एक रोमँटिक फोटो शेअर करत त्याला खास शुभेच्छा दिल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाग्यश्री सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वी तिला सोशल मीडियावर बॉडी शेमिंगवरून ट्रोल करण्यात आलं होतं. यावर तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं होतं. ‘माझ्या बायकोचा प्रियकर’, ‘पाटील’. ‘काय रे रास्कला’ या मराठी चित्रपटात तिने काम केले आहे