‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी-मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. नुकतंच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या सासूबरोबर हा चित्रपट पाहिला. याबद्दल तिने प्रतिक्रिया दिली आहे.

‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरताना दिसत आहे. नुकतंच अभिनेत्री खुशबू तावडेने सासूबरोबर हा चित्रपट पाहिला. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…”, अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, “आई माझ्यावर…”

खुशबू तावडेने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने सासूबाईंबरोबरचा एक फोटो पाहिला आहे. “मी सासूबाईंबरोबर बाईपण भारी देवा चित्रपट पाहिला. मला फार मस्त वाटला आणि सासूबाईंनाही हा चित्रपट आवडला. केदार शिंदे फार चांगला चित्रपट.

सुकन्या मोने, रोहिणी हट्टंगडी, शिल्पा नवलकर, दीपा परब, सुचित्रा बांदेकर, वंदना गुप्ते तुमच्या भूमिका खरंच फारच सुंदर”, असे खुशबू तावडेने म्हटले आहे.

khushboo tawde
खुशबू तावडेची कमेंट

आणखी वाचा : “केसांचा लाल रंग, A अक्षराचे मंगळसूत्र अन्…”, ‘बाईपण भारी देवा’मधील सुचित्रा बांदेकरांच्या लूकची रंगली चर्चा, डिझाईनर म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला भारतासह परदेशातही दणदणीत प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने १७ दिवसात ५४ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. तर अमेरिकेत १०० हजार डॉलर्सची कमाई केली आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.