कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी खुलेपणाने संवाद साधताना दिसतात. काही कलाकार आपल्या खासगी आयुष्याबाबत सोशल मीडियावर भाष्य करत नाहीत. तर काही मंडळी अगदी प्रत्येक माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नात असतात. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. पूजा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. पूजा सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये काम करण्यात व्यग्र आहे. मात्र काम करत असताना तिला आजारपणाचा सामना करावा लागत आहे.
काही दिवसांपूर्वीच पूजाने सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर केली होती. व्हायरल इन्फेक्शनमुळे पूजा सध्या घरीच आहे. तिला शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तिने स्वतःच माहिती दिली होती. शिवाय तिने तिच्या आजारपणाबाबत एक खुलासा केला होता. पूजाला तिच्या आजारपणात अधिक शारीरिक त्रास सहन करावा लागला. अजूनही ती घरीच आराम करत आहे.
आणखी वाचा – Video : राखी सावंतने उडवली मलायका अरोराच्या चालण्याची खिल्ली, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
काय म्हणाली अभिनेत्री?
पूजाने म्हटलं होतं की, “माझं खूप काम बाकी आहे. पण मला बोलणं व चालणंही कठीण झालं आहे. मला या आजारपणाचा राग येतो. तरीही आपल्या आरोग्याची काळजी महत्त्वाची आहे. तुम्ही स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या”. शिवाय सगळ्यांना मास्क घालण्याचाही तिने सल्ला दिला होता. आता पुन्हा एकदा तिने एक पोस्ट शेअर केली आहे.
पूजाने तिचा हसतानाचा फोटो शेअर केला आहे. ती म्हणाली, “आता माझी प्रकृती सुधारत आहे. तुम्ही दिलेलं प्रेम व आशीर्वाद याबाबत सर्वांचे आभार”. पूजाने ही पोस्ट शेअर करताच तू लवकर बरी हो, तू कामाला आता सुरुवात कर, काळजी घे, नेहमी हसत राहा अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.