मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. प्राजक्ताच्या खासगी आयुष्याची कायमच चर्चा होताना दिसते. नुकतंच प्राजक्ताने तिच्या लव्ह लाईफबद्दल मोठा खुलासा केला.

गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळीच्या लग्नाबद्दलची चर्चा सुरु आहे. नुकतंच ‘लोकमत फिल्मी’ला तिने एक मुलाखत दिली. यावेळी तिला ‘तू पहिल्यांदा कोणाला प्रपोज केलं होतं’, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्राजक्ताने हसत हसत उत्तर दिले.
आणखी वाचा : “मी लग्न करायला तयार, पण…” प्राजक्ता माळीने सांगितली लग्नासाठीची पहिली अट

“मी प्रपोज नक्कीच केलं आहे. मलाच प्रपोज करावं लागलं, कारण माझ्या आजूबाजूला जी मुलं होती ती फारच साधी, सरळ होती”, असे प्राजक्ता म्हणाली.

“मी त्यांना डायरेक्ट प्रपोज केलं नव्हतं. तू बरा वाटतोस, चल मग बघू काही होतंय का, असं मी त्याला म्हटलं होतं”, असा किस्साही तिने सांगितला.

आणखी वाचा : “‘बाई, बूब्स आणि ब्रा’ पोस्टनंतर मला एका लग्न झालेल्या पुरुषाने फोन केला अन्…” हेमांगी कवीने सांगितला ‘तो’ किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्राजक्ता माळी ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. ती लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. मात्र याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.