नव्वदच्या दशकातील लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बेर्डे. नाटक, मालिका, चित्रपट व राजकारण या सगळ्यांमध्ये त्या अधिक सक्रिय असतात. सध्या त्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेतून पाहायला मिळत आहेत. त्यांनी सिंधुताईंच्या आजी म्हणजेच पार्वती साठे ही भूमिका साकारली आहे. त्यानिमित्तानं प्रिया बेर्डे यांनी नुकतीच सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या यूट्युब चॅनलेवर मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश का केला? यामागच्या कारणाचा खुलासा केला.

हेही वाचा – अभिनेता सुयश टिळक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस; ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकला

२०२० मध्ये प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातावर घड्याळ बांधलं होतं. परंतु, अवघ्या दोन-अडीच वर्षांत त्यांनी राष्ट्रवादीला राम राम करीत भाजपामध्ये प्रवेश केला. याविषयी ‘मित्र म्हणे’ या यूट्युब चॅनलेवरील मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आलं होतं.

हेही वाचा – Video: सुकन्या मोनेंनी लंडनमध्ये ‘इंद्रधनुष्य’च्या टीमसाठी बनवली गरमागरम कांदाभजी; स्वप्नील जोशी म्हणाला…

सौमित्र पोटे यांनी विचारलं, ‘तुम्ही पहिल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतात. त्यानंतर भाजपमध्ये गेलात? असा पक्षबदल का केला?’ यावर प्रिया बेर्डे म्हणाल्या, “इथे (भाजपा) मला काम करण्यासाठी जास्त संधी वाटली. मला इथे जास्त चांगल्या पद्धतीनं ऐकलं गेलं. माझं म्हणणं ऐकण्यासाठी इथे लोक भेटतात. मोठमोठे वरिष्ठ नेते, मग प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असू दे, फडणवीस साहेब असू दे; हे सगळे नेते भेटतात. हे तुमचं म्हणणं सगळं ऐकतात. एवढंच काय तर सुधीर मुनगंटीवारसुद्धा भेटतात; जे आपले सांस्कृतिक मंत्री आहेत. सांस्कृतिक विषयाबद्दल एवढं ज्ञान असलेला मी अजूनपर्यंत कोणता नेता बघितलेला नाही. आपल्या मनोरंजनसृष्टीबद्दल त्यांना खूप चांगलं ज्ञान आहे. “

हेही वाचा – ‘तुम्ही तुमचं खरं नाव का लावत नाही?’ चाहत्याच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकर म्हणाल्या…

हेही वाचा – Video: अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं केलं कौतुक, म्हणाली, “खरंच…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर त्यांना विचारलं, ‘तुमची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट होत होती?’ त्यावर प्रिया बेर्डे म्हणाल्या, “मी घुसमट नाही म्हणणार. कारण- मी घुसमटणारी नाहीये. त्यामुळे मी बाहेर पडले. इथे मला चांगली संधी होती. ऐकून घेणारी माणसंही आहेत आणि राष्ट्रवादीमध्ये मी दोन-अडीच वर्षं काम केलं. जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. खूप छोट्या पातळीवर काम केलं; पण तिथे मी खूप काम केलं. मग आता म्हटलं, इथे जर आपल्याला चांगली संधी मिळतेय. तेपण आणखी जास्त म्हणजेच जिल्हा पातळीपेक्षा आपण प्रदेशभर चांगलं काम करू शकू.”