Actress Rajeshwari Kharat First reaction on accepting Christianity : मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट्स करून लोक टीका करत आहेत. काहींनी राजेश्वरीने पैशांसाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचं म्हटलं जात आहे. या सर्व टीकेवर राजेश्वरीने उत्तर दिलं आहे.
राजेश्वरीने निवडणुकांमध्ये पैसे, किराणा भरलेल्या पिशव्या या सर्व गोष्टींचा उल्लेख करत एक पोस्ट केली आहे. लोक आज मला जात व धर्म शिकवायला आले आहेत, असं तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
राजेश्वरी खरातची पोस्ट नेमकी काय?
निवडणुका,
प्रत्येकी ५०० रुपये,
किराणा भरून पिशव्या,
दारू व हॉटेलला जेवण
आणि साहेब, दैवत, देवमाणूस,
हे आज जात/ धर्म शिकवायला आले आहेत, तुमचे स्वागत आहे.
कोणी पैशांसाठी किंवा अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारतात, तर कोणी मतदान करतात.
माझ्या मते एकतर दोघेही बरोबर किंवा दोघेही चुकीचे.
टीप : माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील आहे आणि मी सर्व धर्मांचा आदर करते. बाकी वरील पोस्ट मनोरंजक हेतूने स्वीकारली जावी एवढी विनंती, असं राजेश्वरीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटात शालूची भूमिका साकारून लोकप्रिय झालेली राजेश्वरी सध्या तिच्या पोस्टमुळे चर्चेत आहे. तिने जन्म ख्रिस्ती कुटुंबात झाला आहे, असं म्हटलं आहे. ट्रोल करणाऱ्यांना तिने सुनावलं असून निवडणुकांमध्ये वाटल्या जाणाऱ्या पैशांचा उल्लेख केला आहे. कोणी पैसे किंवा कोणी अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारतात आणि कुणी मतदान करतात. चूक असतील तर दोघेही चूक आणि बरोबर असतील तर दोघेही बरोबर, असं मत राजेश्वरीने मांडलं आहे.
दरम्यान, राजेश्वरी खरातने इन्स्टाग्रामवर काही तासांच्या अंतराने दोन पोस्ट केल्या आणि ख्रिश्चन धर्मात प्रवेश असं कॅप्शन एका पोस्टला दिलं. त्यानंतर ट्रोलर्स तिला ट्रोल करत होते. त्यांना राजेश्वरीने उत्तर दिलं आहे.